शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

By अतुल कुलकर्णी | Updated: February 23, 2018 06:13 IST

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. त्यात चार जागा राष्टÑवादीच्या असून आहे ते संख्याबळ आणि काँग्रेसला दिलेला शब्द यासाठी त्यांना तीन जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे किमान दोन जागा कशा मिळवता येतील यासाठी राष्टÑवादीची धडपड सुरू झाली आहे. राष्टÑवादीचे अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त व शरद रणपिसे तसेच भाजपाचे भाई गिरकर आणि महादेव जानकर तर शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील या ११ आमदारांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.काँग्रेस आणि राष्टÑवादीचे विधानसभेतील संख्याबळ ८३आहे. त्यापैकी काँगे्रसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हेकाँग्रेस उमेदवारांना मतदान करतील की नाही याविषयी काँग्रेस नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळे आहे त्या८१ एवढ्या संख्याबळावर दोघांचे मिळून तीन आमदार कसेबसेनिवडून येऊ शकतात. राष्टÑवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांच्या मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा घेताना पुढच्या निवडणुकीतआम्ही तुम्हाला एक जागा सोडूअसे आश्वासन दिले होते. त्यामुळेती एक जागा आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कारण यावेळी काँग्रेसच्या तीन आमदारांचीमुदत संपणार आहे. त्यात माणिकराव ठाकरे हे सध्या उपसभापती आहेत आणि पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यांशी त्यांचे सख्य आहे. शरद रणपिसे व संजय दत्त यांच्यापैकी कोणाची निवड होणार हा प्रश्न कायम आहे.शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार आहेत. ते दोन आमदार आरामात निवडून आणू शकतात. तरीही त्यांच्याकडे काही मते शिल्लक राहतील. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा संधी देताना सेना दुसरीजागा कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी नुकतेच सचिव झालेले मिलींद नार्वेकर जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीतील आपापसातील मारामारी पहाता शेकापचे जयंत पाटील यांना विधानसभेतून निवडून येणे अवघड आहे. ते उभे राहिले तर विरोधकांचीच अडचण होणारआहे. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेल्या अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजीसंपत आहे. त्यांची जागी जयंत पाटील यांना देऊन स्थानिक राजकारण सांभाळायचे व त्याचा फायदा लोकसभा, विधानसभेला घ्यायचाकी पुन्हा अनिल तटकरेंनाच संधी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे.या सगळ्यात भाजपाचा मात्र फायदा होणार आहे. त्यांचे दोन विद्यमान आमदार तर निवडून येतीलच शिवाय आणखी चौघांना त्यांना निवडून आणणे शक्य होणार आहे. राष्टÑवादीचे विद्यमान आ. व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या राष्टÑवादीतून संधी मिळणार नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे ते भाजपाशी संधान साधून असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांनी नवी मुंबईत दोन मोठे कार्यक्रमही घेत भाजपात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्यामुळे भाजपाकडे कामगार नेता येऊ शकतो. मात्र पुन्हा पक्षाबाहेरच्या लोकांनाच संधी देत भाजपाच्या निष्ठावंतांना आणखी कितीवेळा डावलणार असे सवाल पक्षात सुरु झाले आहेत.