मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये महिला शिक्षिका आणि महिला शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपनाची रजा देण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातील महिला शिक्षिकांना व महिला शासकीय कर्मचाऱ्यांनाही बालसंगोपनाची रजा तातडीने मंजूर करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. केंद्राने मंजूर केलेली बालसंगोपन रजा राज्य सरकारी महिला कर्मचारी व शैक्षणिक संस्थांमधील महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना अद्याप लागू करण्यात आलेली नाही. केंद्राने महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ७३० दिवसांची रजा मंजूर केली आहे. राज्य शासनानेसुद्धा महिला शिक्षिकांच्या कल्याणासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे.
महिला शिक्षिकांना हवी बालसंगोपनाची रजा
By admin | Updated: May 9, 2015 01:20 IST