शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांचे शुल्क वाढणार?; शिक्षण आयुक्तांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:40 IST

महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन शालेय शिक्षणाच्या विविध स्तरावरील शासनमान्य शुल्कात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन शालेय शिक्षणाच्या विविध स्तरावरील शासनमान्य शुल्कात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी मंत्रालयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिले आहे. वारंवार शुल्क दरांचे निर्धारण करण्याबाबत प्राप्त होत असलेल्या निवेदनांचा आढावा घेत हे पत्र लिहिले असून, त्यावर कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे.अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयासाठी सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्काची आकारणी शाळा व महाविद्यालयांकडून करण्यात येते. महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे बंधन नसल्याने, शहरातील प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क वेगळे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी आणि शुल्कात एकसमानता आणण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ शुल्क निश्चित करावे, अशी मागणी शिक्षण सुधारणा मोहिमे(सिस्कॉम)च्या संचालिका वैशाली बाफना यांनी सरकारकडे वेळोवेळी केली. त्यांच्या या मागणीची दखल शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी घेत, शिक्षण शुल्कात महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढ होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.शिक्षण आयुक्तांच्या या पत्रानंतर येत्या काही काळात शिक्षण विभागाच्या १ली ते ५वी, ६वी ते ८वी व ९वी ते १२वी या स्तरावरील शिक्षण शुल्क दरात बदल होणे अपेक्षित असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे. मात्र, शुल्कात वाढ झाल्याने याचा फटका पालकांना बसणार असल्याचीही चर्चा आहे.अधिकची आकारणीसद्यस्थितीत पहिली ते दहावी, तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर ४० वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या शुल्क आकारणी दरानुसारच शुल्क आकारणी होत आहे. सध्याच्या महागाईच्या दराला ते अनुसरून नाही, असे सोळंकी यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या कारणास्तव कनिष्ठ महाविद्यालयांकडून सध्याच्या सोयीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी केली जाते. म्हणजेच शासनमान्य शुल्कापेक्षा अधिक आकारणी केली जाते. त्यामुळे एकूणच शुल्क अधिनियमात सुधारणा करून, त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही या पत्रात नमूद आहे.प्रत्येक शाळा आपल्याला वाटेल त्याप्रमाणे शुल्क आकारतात. त्यामुळे पालकांची लूट होते. शुल्कात एकसमानता आणण्यासाठीही नवे बदल लागू होणे गरजेचे असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.शिक्षण आयुक्तांनी केलेल्या पत्रानुसार कार्यवाही झाल्यास यापुढे १ली ते ५वी, ६वी ते ८वी व ९वी ते १२वी या स्तरावरील शिक्षण शुल्क दरात बदल होणे अपेक्षित आहेत. दरवाढीचा फटका पालकांना बसणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण