शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर शिक्षकांची धडक, अनुदानाची मागणी : पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:40 IST

राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली.

मुंबई : राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली. वित्तमंत्री भेटत नसल्याने शिक्षकांनी राष्ट्रगीत म्हणत सरकारचा निषेध केला. या वेळी मलबार हिल पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.अनुदानाच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसल्याने गुरुवारी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट वित्तमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. यातील काहींना पोलिसांनी दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याने शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवस शांततेच्या मार्गाने आझाद मैदानात धरणे दिल्यानंतरही वित्तमंत्री भेटत नसल्याने शिक्षकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्याचे कृती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.आंदोलन सुरूच ठेवणारवित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांमध्ये शिक्षकांचा फुटबॉल केला जात आहे. संबंधित विभागातून शुक्रवारी भेट मिळाली नाही, तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल. मान्य झालेल्या मागण्यांची फाईल शिक्षण विभागातून वित्त विभागाकडे आणि वित्त विभागाकडून शिक्षण विभागाकडे पाठवली जात आहे. त्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारTeacherशिक्षक