जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापूरे यांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आजी, माजी संचालक तसेच तत्कालीन अधिका:यांमध्ये खळबळ माजली आहे. विद्यमान सात संचालकांच्या अडचणी सर्वाधिक आहेत. वसुलीची कारवाई झाली तर त्यांचे पदही अडचणीत येऊ शकते.विद्यमान संचालकांमध्ये आ. अनिल बाबर, विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी अध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र लाड यांचा समावेश आहे. माजी संचालकांपेक्षा विद्यमान संचालकांच्याच अडचणी या प्रकरणामुळे वाढू शकतात.निुकसान निश्चित करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक एम. एल. माळी यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी पूर्ण करून आपला अहवाल दराडे यांच्याकडे सादर झाला होता. त्यानंतर श्रीधर कोल्हापूरे यांनी 88 ची चौकशी करून यातील आजी-माजी संचालक, वारसदार, अधिकार्?यांवर आरोपपत्र दाखल केले आहे. (प्रतिनिधी) असा झाला गैरव्यवहार. बँकेचे 2001-2002 ते 2011-12 या कालावधीतील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण चार्टर्ड अकौंटंट डी. ए. चौगुले यांनी केले असून, त्याचा अहवाल त्यांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांकडे 2 मे 2013 रोजी सादर केला होता. या अहवालात अनेक नियमबाह्य कामांवर ताशेरे ओढण्यात आले होते. यामध्ये बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम, दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नियमबाह्य नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले नियमबाह्य मानधन, नवृत्त अधिकार्?यांवर केलेला नियमबाह्य पगार खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या होत्या.
विद्यमान संचालकांची धास्ती वाढली
By admin | Updated: September 7, 2015 00:51 IST