शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

‘एफडीए’च्या कारभाराची चौकशी करणार

By admin | Updated: May 24, 2017 03:20 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्रालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारभाराच्या अनुषंगाने लोकमतने प्रकाशित

अतुल कुलकर्णी  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मंत्रालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारभाराच्या अनुषंगाने लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेतील मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपल्याकडे दोघांचीही पत्रे आली असून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत या विषयाची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मुंडे यांनी आपल्या पत्रात अनेक गंभीर बाबी मांडल्या आहेत. इफेड्रीन प्रकरणी केलेल्या तपासणीत ३७ प्रकरणांत गंभीर गैरप्रकार आढळून आल्याचे निदर्शनास आणून देऊनही शासन स्तरावर त्यात कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या सहआयुक्तांचीच बदली केली गेली. आस्थापना शाखेच्या तपासणीत अनेक चुका आढळून आल्या. त्यावर काहीही कारवाई केलेली नाही, डब्ल्यूएचओ जीएमपीचा पदभार एकाच अधिकाऱ्याकडे गेल्या आठ वर्षांपासून आहे, त्याच अधिकाऱ्यांकडे विधी विभागाचाही कार्यभार आहे. अनेक अधिकारी मुंबई, ठाण्यात २० वर्षांपासून जास्त काळ ठाण मांडून बसले आहेत, यातून त्यांचे आणि अन्न व औषध विभागाशी संबंधित असणाऱ्यांचे हितसंबंध तयार झाल्याने त्यांच्या तातडीने बदल्या करा, अशी मागणी मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे. इफेड्रीन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराचा अहवाल शासन स्तरावर आला आहे. त्यावर कोणती कारवाई झाली हे आपण स्वत: माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता ती देता येत नाही, असे उलट उत्तर दिले गेले. यावरून शासन यामध्ये गुंतलेल्यांचा बचाव करत असल्याचे स्पष्ट होते, असा लेखी आक्षेपही मुंडे यांनी घेतला आहे.इफेड्रीनबद्दल सगळी प्रशासकीय कारवाई असताना विधी व न्याय विभागाचे म्हणणे मागविणे याचा अर्थच या विभागाचे मंत्री गिरीश बापट निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असा होतो, असे सांगून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या विभागात ठरावीक अधिकाऱ्यांचे रॅकेट झाले आहे. आपल्याला कोणी बदलू शकत नाही अशी भावना वाढीस लागल्याने अधिकारी कोणाचे ऐकत नाहीत आणि राज्यातली जनता वेठीस धरली जात असल्याचेही विखे म्हणाले.