भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएची करडी नजर, खाद्यतेल, गुटख्याचा २५ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:17 AM2017-10-19T05:17:19+5:302017-10-19T05:17:25+5:30

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला

 FDA gets stolen cash, edible oil, gutka worth 25 lakhs on adulterated food items | भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएची करडी नजर, खाद्यतेल, गुटख्याचा २५ लाखांचा साठा जप्त

भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएची करडी नजर, खाद्यतेल, गुटख्याचा २५ लाखांचा साठा जप्त

Next

- जयंत धुळप
अलिबाग : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा २२ लाख ८९ हजार ६५९ रुपये किमतीचा साठा, वनस्पती तुपाचा १ लाख ११ हजार ११७ रुपये किमतीचा साठा, तर गुटखा व पानमसाल्याचा १ लाख ७१ हजार १२४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी दिली आहे.
दिवाळी सणाच्या कालावधीत रायगड अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम आखून, अन्न नमुने घेणे, अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६अंतर्गत विश्लेषण करणे, खाद्यपदार्थ विक्रेते, स्टॉलधारक यांची तपासणी करून अनुचित असल्यास कारवाई करणे, अशी कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. यासाठी सात पथके कार्यान्वित करण्यात आल्याचे संगत यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत खाद्यतेलाचे २९, वनस्पती तुपाचे ८, बेसन, रवा व मैद्याचे १०, मिठाई व खव्याचे १३ व इतर अन्नपदार्थांचे ९ नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
मिठाईमध्ये रंग १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावा
मिठाई विक्रेत्यांनी रोज ताजी मिठाई तयार करावी. रंग वापरताना तो १०० पीपीएमपेक्षा जास्त नसावा, खाद्यरंगाचा वापर करावा, असे आवाहन संगत यांनी केले आहे.

दिवाळी व सणासुदीच्या काळात ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना बिल घ्यावे, त्याचबरोबर परवानाधारक व नोंदणीधारक व्यावसायिकांंकडूनच मालाची खरेदी करावी. पॅकबंद अन्नपदार्थांवरील लेबलवर उत्पादकाचा पत्ता, उत्पादनाची तारीख, बॅच नं., अन्नपदार्थ वापरण्याची अंतिम तारीख या बाबींचीही शहानिशा करूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, असे संगत यांनी सांगितले.

तक्रारीकरिता टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर संपर्क साधा.
खाद्यपदार्थांबाबत किंवा मिठाईबाबत काही शंका असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्र. १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांनी अखेरीस केले आहे.

Web Title:  FDA gets stolen cash, edible oil, gutka worth 25 lakhs on adulterated food items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न