शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:01 IST

सात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

ठळक मुद्देसात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील पाच विभागांत ऑनलाइन अकरावी प्रवेशासाठी प्रवेशाच्या तीन नियमित व एक विशेष फेरी होऊनही अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अनेक कारणांनी प्रवेश घेतलेले नाहीत, तर अनेकजण प्रवेशाच्या यादीत नाव न आल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीला मान्यता देण्यात आली असून, मंगळवारपासून ही फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीची सात टप्प्यांत विभागणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. 

अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे दहावीचा सगळ्यात जास्त निकाल यंदा लागला. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रवेशाची निश्चिती झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेकांना महाविद्यालयांच्या नव्वदीपार कट ऑफमुळे यादीत जागाच मिळाली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएसचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून (दि. २८) या फेरीला सुरुवात होत असून, १३ ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांत नोंदणी करून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहेत, तर शेवटचा टप्पा एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

विशेष फेरीच्या अखेर अमरावती विभागात ८,९५७, मुंबई विभागात १,८४,७०१, नागपूर विभागात २८,९३४, नाशिक विभागात १६,५४५, तर पुणे विभागात ६०,८७८ प्रवेश झाले आहेत. राज्यभरातील या पाच विभागात विशेष फेरीच्या अखेर तीन लाख १५ प्रवेश झाले आहेत. अद्यापही दोन लाख ३४ हजार जागा रिक्त असून, एफसीएफएस फेरीत या जागांवर प्रवेश होणार आहेत. 

एफसीएफएस प्रवेशाचे टप्पे 

पहिला टप्पा २८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर९० टक्क्यांवरील विद्यार्थीदुसरा टप्पा३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर,८० टक्क्यांवरील विद्यार्थी तिसरा टप्पा२ ते ४ ऑक्टोबर७० टक्क्यांवरील विद्यार्थी चौथा टप्पा५ ते ६ ऑक्टोबर६० टक्क्यांवरील विद्यार्थी पाचवा टप्पा ७ ते ९ ऑक्टोबर५० टक्क्यांवरील विद्यार्थी सहावा टप्पा१० ते १२ ऑक्टोबरदहावी पास होऊन प्रवेशास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सातवा टप्पा१३ ते १४ ऑक्टोबरएटीकेटी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

टॅग्स :collegeमहाविद्यालयMaharashtraमहाराष्ट्र