शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

मदतीसाठी वडिलांची वणवण

By admin | Updated: June 7, 2017 02:34 IST

वंशाचा दिवा म्हणून दोन्ही मुलांना लाडा-कौतुकाने वाढविले, मात्र त्याच मुलांनी ७० वर्षांच्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वंशाचा दिवा म्हणून दोन्ही मुलांना लाडा-कौतुकाने वाढविले, मात्र त्याच मुलांनी ७० वर्षांच्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले. आजारी आईला मुलीने आधार दिला. मात्र ७० वर्षांचे वृद्ध वडील अजूनही रस्त्यावर जीवन जगत असल्याची मन हेलावून टाकणारी घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. आता या वृद्धाने मदतीसाठी पुन्हा भांडुप पोलिसांकडे धाव घेतली. भांडुप पश्चिमेकडील फरिदनगर परिसरात ७० वर्षांचे राधेश्याम पाठक पत्नी लालतीदेवी, दोन मुलांसोबत राहायचे. मुलगा राकेशकुमार आणि विनोदकुमार दोघेही चालक म्हणून काम करतात. तर मुलीचे लग्न झाले आहे. मुलांच्या लग्नानंतर काही वर्षांतच त्यांना आई-वडिलांची अडचण वाटू लागली. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी दोघांनाही मारहाण करून त्यांना घराबाहेर काढले. अशावेळी आजारी असलेल्या लालतीदेवी यांना रस्त्यावर आलेल्या पाठक यांनी रुग्णालयात दाखल केले. तिचा खर्च उचलण्यासाठी खिशात पैसे नाहीत. मुलांच्या भवितव्यासाठी जमवलेली पुंजी खर्च केली. अशावेळी नेहमी दुर्लक्ष केलेली मुलगी आई-वडिलांचा आधार ठरली. अडीच वर्षे तिने दोघांनाही आधार दिला. मुलीच्या सासरी आणखी किती दिवस राहायचे म्हणून पाठक पुन्हा मुलांकडे निघून आले. मात्र तेथे परिस्थिती जैसे थेच होती. मुलांनी मंगळवारी पुन्हा पाठक यांना धक्के मारून घराबाहेर काढले. त्यांनी थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तसेच मुलांकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.>आता मला न्याय हवा‘हक्काचे घर असतानाही मुलांकडून रस्त्यावर राहण्याची वेळ ओढावली आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळा भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यांना तात्पुरती समज दिल्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. महिन्याला मिळणारे अडीच हजार रुपये पत्नीच्या औषधासाठी खर्च होतात. मुले असे वागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुले आणि सुना जिवावर उठल्या आहेत. मात्र आता मला न्याय हवा आहे,’ असे पाठक यांनी सांगितले.