शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या बापाने केली तीन लहान मुलांची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:09 IST

या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकोला: बोरगाव येथील धोतर्डी परिसरात बुधवारी वडिलांनी आपल्या तीन लहान मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. आज संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील तिन्ही मुले अल्पवयीन असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अजय विष्णू इंगळे (17),  मनोज विष्णू इंगळे (16), शिवानी विष्णू इंगळे (15), अशी या लहा मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू इंगळे यांनी आधी विष पाजून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने विष्णू  इंगळे यांनी दोन मुलांना शॉक देऊन ठार केले. तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंटा घालून त्याला ठार मारले. त्यानंतर विष्णू इंगळे यांनी शॉक आणि गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इतके करूनही जीव जात नसल्याने विष्णू इंगळे यांनी शरीरावर धारदार शस्त्राने वार करून घेतले. परंतु, त्यांचे हे सर्व प्रयत्न फसले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे मुलांचे प्राण गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. विष्णू इंगळे यांनी हे कृत्य का केले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा