शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

नादच खुळा! क्रिकेटशौकीन मुलासाठी वडिलांनी शेतातच बनविले मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:57 IST

मुलाचा हट्ट पुरवला; ५ एकरावरील द्राक्षबाग केली भुईसपाट

- सचिन कांबळेपंढरपूर (जि. सोलापूर) : क्रिकेटचे वेड असलेल्या मुलाला लॉकडाऊनमध्ये  सराव करता येत नाही, ही अडचण लक्षात घेऊन त्याचा हट्ट पुरवण्यासाठी  अनवली (ता. पंढरपूर) येथील एका शेतकऱ्याने चक्क पाच एकर शेतातील द्राक्षबाग तोडून त्यावर राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान तयार केले आहे. अनवलीच्या बाळासाहेब सूर्यवंशी यांचा मुलगा अभियशला क्रिकेटची आवड आहे. दहाव्या इयत्तेत असलेला अभियश कोल्हापूरमध्ये क्लबमधून तासन‌्तास प्रॅक्टिस करीत होता. गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्याकडून तो खेळला. पुण्यातही क्लबकडून दोन स्पर्धा जिंकल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. दीड वर्षापासून कोरोनामुळे तो अनवलीला आला. गावी क्रिकेटचा सराव होत नसल्यामुळे तो बेचैन होता. त्याने वडिलांकडे खेळपट्टीबाबत हट्ट धरला. मुलाच्या हट्टासाठी वडिलांनी शेतातील ५ एकर द्राक्ष बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी व मैदान बनवणे सुरु केले. बाग काढल्यावर संपूर्ण रान अडीच फूट मातीने भरून घेतले. घरातील वाहने व मशिनरी वापरून पाहता पाहता हे ग्राऊंड तयार झाले. मुंबईतून खेळपट्टी व ग्राऊंडवर लावायचे गवत आणून लावले जात आहे. इथे सध्या राष्ट्रीय दर्जाच्या ४ खेळपट्ट्या, २ प्रॅक्टिस खेळपट्ट्या व दोन सिमेंट खेळपट्ट्या बनविल्यल्या मजुरांकडून लॉन तयार करणे सुरु सुरू  आहे. दोन महिन्यात ग्राऊंड तयार होणार असे बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले.अभियश हा सध्या चेंडू फेकणाऱ्या मशीनवर सराव करीत असून, नियमित व्यायाम करत आहे. यापूर्वीही त्याच्यासाठी लहान खेळपट्ट्या शेतात बनविल्या आहेत.क्युरेटरकडून पाहणीमुंबई येथील वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर महामुणकर यांनी अनवली येथे येऊन या खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर महामुणकर यांनी मैदान व्यवस्थित झाल्याचे सांगितले.इतर खेळाडूंचीही मदतखेळपट्टी आणि मैदान तयार करण्यासाठी पंढरपूर परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने मदतीला येत आहेत. मैदानावर गवत लावणे, रोलिंग करणे अशी कामे हे खेळाडू करीत आहेत. येत्या दोन महिन्यात मैदान तयार झाल्यावर येथे १४ आणि १६ वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्याचे नियोजन असल्याचे वैभव बडवे यांनी सांगितले.