शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By admin | Updated: May 25, 2017 00:24 IST

पनवेल महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपवाद वगळता शांततेमध्ये मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल, नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपवाद वगळता शांततेमध्ये मतदान झाले. मतदानासाठी सकाळी सर्वत्र रांगा लागल्या होत्या. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. २० प्रभागामधील ७८ जागांसाठी नशीब आजमावणाऱ्या ४१८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. महाराष्ट्रातील २७ वी व रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असणाऱ्या पनवेलच्या निवडणुकीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. सकाळी मतदान सुरू होताच सर्वच केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषत: तळोजा व मूळ गावांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने सेल्फी स्पर्धा जाहीर केली होती. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम मतदान करणाऱ्या नागरिकांनी त्यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर शेअर करून मतदानाचे आवाहन करण्यास सुरवात केली. यामुळे सकाळच्या सत्रामध्ये चांगले मतदान झाले. आपल्या प्रभागाचा नगरसेवक ठरविण्याचा अधिकार असल्याने युवक-युवती मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडले होते. प्रभाग १८ मध्ये अनुसया गणपती पवार या १०१ वर्षांच्या आजींनीही मतदानाचा अधिकार बजावला. मतदानासाठी आलेल्या या आजींना पाहण्यासाठीही गर्दी झाली होती. याशिवाय अपंग नागरिकांनीही मतदानाचा अधिकार बजावला. त्यांना मतदान केंद्रामध्ये जाताना रांगा लावता येवू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. अनेक ठिकाणी पोलिसांनी व मतदान केंद्रावरील इतर नागरिकांनी अपंगांना उचलून केंद्रामध्ये घेवून गेले. दुपारी तापमान ३६ अंशावर गेल्याने केंद्रामध्ये गर्दी कमी झाली होती. उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर पुन्हा रांगा लागल्या होत्या. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. तब्बल दीड हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये तळ ठोकून होते. याशिवाय दंगल निवारण पथक, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही पाचारण करण्यात आल्या होत्या. पनवेलमध्ये एका मतदाराने मतदान करतानाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याने त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. तळोजा परिसरामध्ये काही वेळ मतदान यंत्रामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. खारघरमध्ये एका महिलेने माझे मतदान दुसऱ्यानेच केल्याचा आरोप केला. किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेमध्ये पार पडल्याने पोलिसांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जागृत मतदारपनवेल महानगरपालिकेच्या सर्वच मतदार संघाचा आढावा घेतल्यास शहरी भागात मतदानाविषयी मतदार अनुत्साही दिसले. अनेक कार्यकर्ते घरोघरी पोहोचून मतदारांना बाहेर काढत होते. मात्र, या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. प्रभाग क्र मांक १, २, ३मध्ये मतदानाचा टक्का जास्त म्हणजे, ७५ टक्क्यांच्या पुढे होता. पनवेल परिसरातील बँका बंद पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. या क्षेत्रातील अनेक बँका मतदान असल्याने बंद ठेवण्यात आल्या होत्या, यामुळे अनेकांना व्यवहारात अडथळ्यांना सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, याबाबत अनेक ग्राहकांना कल्पना नसल्याने बँकेतून रिकाम्या हाती परतावे लागले. सेल्फी स्पर्धेमुळे मतदारांमध्ये वाढपनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये, ‘मतदार जनजागृती मोहीम’, ‘सेल्फी स्पर्धा’, पनवेल पालिका हद्दीतील हॉटेलमधील ‘बिलावर २५ टक्के सूट’ यासारखे उपक्र म राबविण्यात आले होते. मात्र, उन्हाळी सुटीत मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का वाढला नाही. सेल्फी स्पर्धेमुळे युवा मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला. मतदानाची सेल्फी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर शेअर करून इतरांना मतदानासाठी प्रवृत्त केले जात होते. त्यामुळे तरुण मतदार आपला हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. सेल्फी स्पर्धेसाठी कंपार्टमेन्ट नाही पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता सेल्फी स्पर्धेत भाग घेणाऱ्या निवडक विजयी मतदारांना करात २५ टक्के सूट देण्यात येणार आहे. या स्पर्धेची उत्सुकता तरु णांमध्ये होती. मात्र, सेल्फी काढण्यासाठी मतदार केंद्रावर सेल्फी कंपार्टमेन्ट नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. तरीदेखील सेल्फी काढण्यासाठी मात्र तरु ण वर्गात मोठी उत्सुकता पाहावयास मिळाली. १०१ वर्षांच्या आजीबार्इंचे मतदान महापालिका प्रभाग १८ मध्ये अनुसया गणपती पवार या १०१ वर्षांच्या आजीबार्इंनीही मतदानाचा अधिकार बजावला. मतदान केंद्रांवर हा चर्चेचा विषय बनला होता. शंभरी पार पाडल्यानंतरही अनुसया या चार मजले चढत असल्याचे त्यांच्याबरोबर असणाऱ्यांनी सांगितले. त्यांच्याप्रमाणे इतरही ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात मतदानामध्ये सहभाग घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्र ारप्रभाग-२०मधील ३ क्र मांकाच्या मतदान केंद्रावर एका व्यक्तीने मतदान करतानाचे शूटिंग करून व्हॉट्सअ‍ॅपवर टाकून, ‘विकासासाठी मतदान’, असा मेसेज टाकल्याची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्र ार करण्यात आली आहे. याबाबत गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर प्रभाग-१७ मधील मतदान केंद्र २३मधील मतदान केंद्रप्रमुख प्रत्येक मतदाराला मत कसे द्यावे? सांगण्यासाठी मतदान यंत्रापर्यंत जात असल्याने अनेकांनी त्याबाबत तक्र ार केली. तर, ‘मतदाराला मत कसे द्यावे, हे समजत नाही म्हणून मी जात होतो’, असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक-१मधील खुटारी गावातील युवराज म्हात्रे यांचा बुधवारी लग्नसोहळा होता. मतदानाची तारीख आणि लग्नाची तारीख, असा योगायोग जुळून आल्याने या वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी नवरदेव युवराज सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. बांठियात सर्वात जास्त मतदान पनवेलच्या पहिल्या महानगरपालिकेसाठी बुधवार, २४ मे रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरु वात झाली. प्रभाग-१७मधील सर्वात जास्त मतदान बांठिया स्कूलमध्ये होते. या ठिकाणी पोलिसांनी सकाळपासून मोठा बंदोबस्त लावला होता. मतदान केंद्रासमोरील रस्ता वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. ज्येष्ठांचा पुढाकार पहिल्या-वहिल्या पनवेल महानगरपालिके च्या निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकदेखील घराबाहेर पडले होते. ७० वर्षांचे आजी-आजोबा, तसेच अपंग व्यक्तीदेखील मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत होते. मतदानासाठी कडक बंदोबस्त पनवेल महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली होती. यामुळे मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सहायक आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, १५४ सहायक निरीक्षक, १३०४ कर्मचारी, मुख्यालयातील दोन राखीव पथके, आरसीपीची व एसआरपीची एक तुकडी व ४७ वाहने बंदोबस्तासाठी तैनात केली होती. संवेदनशील मतदार केंद्राबाहेर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.