शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

१० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:09 IST

घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकणार नाही हा माझा शब्द आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

रायगड - Manoj Jarange Patil PC ( Marathi News ) सरकारने सगेसोयरे याबाबत अधिसूचना काढली त्याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी. अद्याप प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाला नाही. सगेसोयरेबाबत १५ दिवसाच्या वेळेत त्याचे विशेष अधिवेशन बोलावून कायद्यात रुपांतर करावे. तातडीने उद्यापासून अंमलबजावणी सुरू केली नाही तर १० फेब्रुवारीपासून मी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही. कायदा टिकवण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. नोंदी मिळत नाही, समिती कामही करत नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, समिती काम करत नसल्याचे दिसते, नाईलाजास्तव सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी करून ज्याची कुणबी नोंद मिळाली त्यांच्या सगेसोयऱ्यांना आणि कुटुंबाला प्रमाणपत्र वाटप होणे गरजेचे आहे. म्हणून या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि हा कायदा मराठ्यांसाठी कायमस्वरुपाचा असावा यासाठी आमरण उपोषणाची रायगडच्या पायथ्याहून घोषणा करतोय. त्याचसोबत अंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेण्याचं सांगितले होते. त्याठिकाणी तातडीने सरकारनं शब्द वापरला होता. तात्काळ याचा अर्थ काय? सरकारची भूमिका कळत नाही त्यामुळे १० फेब्रुवारीच्या आत सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच हैदराबादचे गॅझेट समितीने अद्याप स्वीकारले नाही. सगेसोयऱ्यांबाबत अद्याप अर्ज दाखल होऊनही प्रक्रिया सुरू केली नाही. मी साडेपाच वाजेपर्यंत माहिती घेतली. हैदराबादचे गॅझेट तातडीने स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा दिला पाहिजे. १८८४ ची जणगणनाही समितीला द्यावी. १९०२ चा दस्तावेजही अद्याप घेतला नाही. सगेसोयरे याबाबत राजपत्रित अधिसूचना दिली ते टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्ये दोन भूमिका असल्याचे दिसते या सर्व मुद्द्यांसाठी १० तारखेपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. १५ दिवसांचा वेळ आहे. मराठा समाजाच्या फायद्यापुढे दुसरं काही सहन करू शकत नाही असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. 

दरम्यान, घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकणार नाही हा माझा शब्द आहे. मी आंदोलन थांबवले नाही. थांबवणारही नाही. दस्तावेज सापडो अथवा न सापडो त्यासाठी सगेसोयरे कायदा मोठा आहे. मुंबईला गेलेला लढा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा होता. सगेसोयरे याची व्याख्या जी वाटते ती अभ्यासकांनी २ लाईनमध्ये १५ दिवसांत कळवावी. प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. मराठ्यांनी एकजूट करावी. १५ दिवसांत मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील