पुणे - नव्या खरीप हंगामातील पीककर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, सातबारा, आठ-अ व फेरफार उताऱ्यांना मागणी वाढली आहे. हे उतारे ऑनलाइन उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी डिजिटली साइन्ड उताऱ्यांचा आधार घेतला आहे. भूमिअभिलेखच्या संकेतस्थळावरून वर्षभरात ४ कोटी ३५ लाख ऑनलाइन अभिलेख डाऊनलोड केले. यातून ७६ कोटी ८० लाखांचा महसूल भूमिअभिलेखकडे जमा झाला.
स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारासरकारच्या ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, आठ-अ उतारे, मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
३१ मार्चपूर्वी जमिनींचे अनेक व्यवहार झाले. यातून तयार झालेले नवीन उतारे डाऊनलोड करण्यात येत आहेत. डिजिटली साइन्ड उतारा पंधरा रुपयांत मिळत असला तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही. - सरिता नरके(राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प, भूमी अभिलेख विभाग, पुणे)डाऊनलोडचा विक्रमराज्यात २६ जून २०२४ रोजी एका दिवसात सुमारे तीन लाख उतारे डाऊनलोड करण्याचा विक्रम घडला. यातून महसूल विभागाला ४५ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्यापूर्वी ६ जुलै २०२३ रोजी राज्यात २ लाख १५ हजार उतारे डाऊनलोड झाले आहेत. यामुळे सुमारे ३६ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. शेतकरी तंत्रस्नेही झाल्यामुळे डिजिटल क्रांती होत आहे.