शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणारच!; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील एकत्र आले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले

By प्रमोद सुकरे | Updated: January 6, 2026 16:38 IST

शेतकरी संघटनेच्या नेत्यांची समाज माध्यमातून व्हायरल छबी चर्चेत

प्रमोद सुकरेकराड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी, रयत क्रांती व बळीराजा या संघटनांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, रयत शेतकरी संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत व बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांच्यातील सध्याचे सख्य सर्वश्रूत आहे. पण, शनिवारी हे तिन्ही नेते एकत्र आले. त्यांचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले. त्याबाबत चर्चा झाल्या नाहीत तरच नवल! अनेकांना तर त्यामुळे सुखद धक्काही बसला. कार्यकर्त्यांनी मग त्याचा मागोवा घेतला तेव्हा न्यायालयाच्या तारखेवेळी हे एकत्रित आले होते हे समोर आले.पाचवड फाटा (ता. कराड) येथे २०१४मध्ये ऊस दरासंदर्भात शेतकरी संघटनेचे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी सातारजवळ एक बस जाळल्याची घटना घडली होती. त्याची तारीख सातारच्या कनिष्ठ न्यायालयात बरेच वर्षे सुरू आहे. शनिवारी त्याच्या सुनावणीसाठी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील आदींना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस होती.त्यामुळे दुपारी ३:००च्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी न्यायालयात पोहोचले होते.इस्लामपूरहून निघालेल्या सदाभाऊ खोत यांची गाडी अगोदर टाळगाव (कराड) येथे गेली. त्यांनी आजारी असलेल्या पंजाबराव पाटील यांना गाडीत घेतले. दुपारी चार वाजता ते न्यायालयात पोहोचले. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी न्यायालयासमोर हजेरी लावली. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पंजाबराव पाटील आवारात गाडीतच बसून होते.न्यायालयातून बाहेर पडताना राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीत बसलेल्या पंजाबराव पाटील यांच्याकडे जात त्यांची विचारपूस केली. त्यावेळी कोणीतरी आपला एकत्रित फोटो घेऊया, असे म्हटले. मग सगळे एकाच फ्रेममध्ये दिसले. तो फोटो शेतकरी चळवळीसाठी काम करणाऱ्या विविध ग्रुपमध्ये व्हायरल झाला. मग त्याबाबत चर्चा तर होणारच!एकाच लिफ्टमधून उतरले खाली!न्यायालयातील काम आटोपल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सचिन नलवडे व प्रमुख पदाधिकारी एकाच लिफ्टमधून खाली उतरले. त्यावेळी आपण अजून किती दिवस या तारखा खेळत बसायच्या हे माहीत नाही? कुठे कुठे कशा तक्रारी आहेत, माहिती नाहीत, अशा चर्चा त्यांच्यात झाल्या.

गुरुवारी पुन्हा एकत्रित येणारन्यायालयाने याबाबतची पुढील सुनावणी गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी ठेवली आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा ही तिन्ही नेते मंडळी सातारच्या न्यायालयात एकत्र पाहायला मिळणार आहेत. पण, सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, मतभेद, मनभेद विसरून हे नेते पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्रित दिसणार का? काळाच्या पोटात काय दडलंय कोणास ठावूक?

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetty, Sadabhau Khot, Punjabrao Patil together; discussions spark!

Web Summary : Raju Shetty, Sadabhau Khot, and Punjabrao Patil, prominent farmer leaders, reunited at a court hearing, sparking discussions about their future collaboration for farmers' issues. The next hearing is on January 8th.