शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: June 9, 2017 04:45 IST

हिंगणी बु. येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुलीला मारहाण करणाऱ्यांना अटक करून शिक्षा करावी, या मागणीसाठी हिंगणी बु. येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप करीत कारवाईचे आश्वासन दिल्याने हा शेतकरी खाली उतरला.बीड तालुक्यातील हिंगणी बु. येथील त्र्यंबक विश्वनाथ तोडकर यांची विवाहित मुलगी कविता रमेश लिंगे हिला शेजारी राहणाऱ्या सचिन आणि नितीन कल्याण ताटे तसेच सुनीता कल्याण ताटे या तिघांनी मारहाण केली. यामध्ये कविताचा एक पाय निकामी झाला. ही घटना २० एप्रिल २०१५ रोजी घडली होती. त्यानंतर त्र्यंबक तोडकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवल्यावर या तिघांवर गुन्हाही दाखल झाला. परंतु पोलिसांनी पुढे कारवाई केली नाही. ते अद्यापही मोकाटच आहेत. शिवाय हे सर्व घराजवळच राहत असल्याने आम्हाला नेहमी मानसिक, शारीरिक त्रास देत आहेत. आम्ही याला वैतागलो आहोत, असे तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.>५ जूनपासून आंदोलनपोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने तोडकर हे कविताला सोबत घेऊन ५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. तीन दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापलेल्या तोडकर यांनी गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका झाडावर चढून गळ्याला दोरीने फास आवळला होता.तहसीलदार शिंगोटे व शिवाजी नगर पोलिसांकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाले, तेव्हाच ते खाली उतरले.