शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आणखी किती दौरे करणार? नुकसानभरपाई द्या; शेतकऱ्यांचा टाहो, नेते आले अन् गेले, मदत मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:52 IST

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

वर्धा :

विदर्भात जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय समिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे शिष्टमंडळ आदी राज्यकर्त्यांनी पाहणी दौरे केले. दौरे आटोपले; पण अद्याप नुकसानभरपाईचा पत्ता नाही. त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब, मदत द्या, असा संतप्त सवाल हताश शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेती  पाण्याखाली आल्याने पिके खरडून गेली. अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले. मात्र, अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांत कमालीचा रोष असून, आता आश्वासन नको, आर्थिक मदत हवी, अशी मागणी शेतकरी करू लागल्याचे चित्र आहे.

पावसाच्या नुकसानीचेही पंचनामेअनेक भागांत कमी पाऊस झाला तरी बांध फुटल्याने शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक भागांत अतिवृष्टी नाही मात्र, सततच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे निदर्शनात आल्यास तेथेही पंचनामे करा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला बजावले.

टॅग्स :Farmerशेतकरी