शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा मित्र संकटात; भ्रामक समजुती मांडूळ सापाच्या जिवावर

By atul.jaiswal | Updated: August 15, 2018 11:10 IST

सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

अकोला : सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी तसेच औषधे बनविण्यासाठी विदेशात या सापाचा उपयोग होतो, अशा एक ना अनेक कपोलकल्पित समजुती पसरल्यामुळे या सापाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधींची किंमत मिळत आहे. त्यातूनच या तस्करी करणा-या टोळ्या वाढल्या असून, त्यामुळे या सापाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता सर्पतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.अकोल्यात गत आठवड्यात मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. यापूर्वीही जिल्ह्यात मांडूळ सापाची तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अलीकडच्या काळात या सापाच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात सर्पतज्ज्ञांकडून माहिती घेतली असता, या सापाबद्दल असलेल्या चुकीच्या समजुती हेच तस्करीमागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले. मांडूळ साप हा गुप्तधन शोधणे, पैशांचा पाऊस पाडणे, यासाठी उपयोगाचा असल्याची भ्रामक समजूत लोकांमध्ये पसरली आहे.वास्तविक पाहता मांडूळ साप हा अत्यंत शांत, निरुपद्रवी व बिनविषारी असून, तो भुसभुशीत जमिनीत बीळ करून राहतो. त्यामुळे हा साप भूगर्भात दडलेले गुप्तधन शोधून काढतो, असा चुकीचा समज पसरला आहे, असे ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ व वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक बाळ ऊर्फ जयदीप काळणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मांडूळ हा साप दंडगोलाकार असून, त्याचे शेपूट व डोक्याचा भाग हा एकसारखा असल्यामुळे या सापाला ‘दुतोंड्या’ असेही संबोधले जाते. 

औषधे उपयोगाबाबत प्रश्नचिन्हमांडूळ सापाचा वापर हा चीन व इतर देशांमध्ये औषधांसाठी होतो, असे मानले जाते. एड्स या जीवघेण्या रोगावरील औषधासाठी मांडूळ उपयोगी असल्याचे मानले जाते. तथापि, यासंदर्भात कुठलाही आधार आढळत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही याबाबत मौन बाळगतात.

जिल्ह्यात दोन कारवायामांडूळ सापाची तस्करी करणा-या टोळ्या संपूर्ण राज्यात कार्यरत असून, त्यांचे आंतरराज्यीय ‘कनेक्शन’ असल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी गत वर्षभरात दोन कारवाया करून मांडूळ तस्करी करणा-यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गतवर्षी चोहोट्टा बाजारनजीक मांडूळ सापाची खरेदी-विक्री करणा-यांना पोलिसांनी जेरबंद केले होते. यावर्षी १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील राधास्वामी सत्संग केंद्राजवळ मांडूळ सापाची तस्करी करणा-या सहा जणांची टोळी पकडली. यावर्षी मार्च महिन्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथेही पोलिसांनी मांडूळ तस्करी करणा-यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

मांडूळ साप हा निरुपद्रवी असून, तो शेतक-यांचा मित्र आहे. गुप्तधन शोधण्यासाठी त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही. या केवळ भ्रामक व चुकीच्या समजुती आहेत. औषधे उपयोबाबतही कोणताही शास्त्रीय आधार नाही. - बाळ काळणे, सर्पतज्ज्ञ व मानद वन्यजीव रक्षक, अकोला.