शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ! मुलीच्या लग्नासाठी विकली बैलजोडी; वयोवृद्ध मायबापाच्या हाती ‘जू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:12 IST

वैजनाथ सूर्यवंशी यांच्या नावावर दोन लाखांचे कर्ज असून, कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जमिनीची फोड केली. 

महेबूब बक्षी औसा (जि. लातूर) : आधी अस्मानी, तर कधी शेतीमालाला दर नसल्याने सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होत नाही. संकटांना तोंड देत औसा तालुक्यातील शिवणी बु. येथील वैजनाथ सूर्यवंशी (वय ७५) व सत्यभामा सूर्यवंशी (वय ७२) हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य दहा वर्षांपासून जवळपास सहा एकर शेतीची मशागत स्वत: करीत आहेत. पेरणी झाली की मग कोळपणीसाठी स्वत:च्या खांद्यावर जू घेऊन बैलाप्रमाणे राबतात.   

वैजनाथ सूर्यवंशी यांना दोन मुली आणि एक मुलगा. मुलगा लातुरात किराणा दुकानात नोकरी करतो. शेतीतून निघालेल्या उत्पन्नातूनच मुलीचे लग्न केले. लग्नात झालेल्या खर्चामुळे शेतीसाठी बैलजोडी घेता आली नाही. 

तरीही दोघांनी खचून न जाता मशागतीचे काम सुरूच  ठेवले. पेरणी ते दुसऱ्याकडून करून घेतात. पण, कोळपणीसह इतर मशागतीसाठी पती जू खांद्यावर घेतात, तर पत्नी खंबीरपणे साथ देते. हे सत्र तब्बल दहा वर्षांपासून सातत्याने सुरू असून, आजही त्यांच्या खांद्यावरील जू उतरलेला नाही. वैजनाथ सूर्यवंशी यांच्या नावावर दोन लाखांचे कर्ज असून, कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जमिनीची फोड केली. 

उत्पन्नच कमी, बैलजोडी खरेदी करावी कशी?दिवसाला एकरभर रान ओढणाऱ्या वयोवृद्धांची हिम्मत कमालीची असून, दररोज अंगदुखी, हात सुजणे, पायदुखी होते. पण सवय आणि गरज हे सर्व वेदना सहन करण्याची ऊर्जा देत असल्याचे वैजनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरी