शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींसारखी पारदर्शकता नसल्यानेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 02:35 IST

फडणवीस यांची टीका; सरसकट कर्जमाफी नसल्याचा मांडला मुद्दा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात आखलेल्या सर्व योजना पारदर्शी असून, त्यात अटी-शर्ती नाहीत. मात्र सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी देऊ असे सांगणाऱ्यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अटी-शर्ती लादून फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये केली.‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत मध्य नाशिक मतदारसंघामधील पाच हजार कार्डांचे वितरण रविवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आयुष्यमान भारत’ ही अत्यंत पारदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वच योजना अशाच पारदर्शी असतात. त्यात अटी-शर्ती नसतात. मात्र राज्यातील सरकारे मात्र एक लाख रुपयात बंगला आणि खाली अटी-शर्ती लागू अशा स्वरूपाच्या योजना करू लागले आहेत. निवडणुकीत शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर अटी-शर्ती लादण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही. आमचे सरकार सत्तेवर असताना त्यावेळी शेतकºयांना आधार लिंक करण्यास सांगितले, त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, असे सांगितले गेले. मात्र आता जीआर बघा, प्रत्यक्ष ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आपल्या नावावर किती कर्ज आहे, त्यातील किती भरपाई मिळणार आहे, ते बघा, ते मान्य असेल तर अपलोड करा अशा प्रकारच्या अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे, असे फडणवीस म्हणाले.यावेळी फडणवीस यांच्या हस्ते चार लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डांचे वाटप करण्यात आले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी वेळी मनोगत व्यक्त केले.बेळगावप्रश्नी मराठी माणसाबरोबरच राहणारबेळगावमधील मराठी माणसाच्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असे स्पष्ट केले आणि नाशिकमध्ये निओ मेट्रो रद्द करण्यासाठी घालण्यात आलेला घाट दुर्दैवी आहे. योजनेविषयी शंका असतील, तर त्या समजावून घ्या, परंतु नाशिककरांचे नुकसान करू नका, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी