शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:48 IST

ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा महाविकास आघाडीच्या सरकाराला विसर पडला असून ह्या लबाड सरकारकडून रोज शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त तालुका, नक्षलग्रस्त जिल्हा आणि कायम  दुष्काळी तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना सुरु केली होती आणि त्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात आले होते. मात्र आता या सरकारने त्याची सबसिडी थांबवून ठेवली आहे. तर ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

तर फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीला शिवसेनेचा,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. मात्र आता त्यांनी केलेल्या कर्जमाफी योजनेत मध्यम मुदती कर्ज घेतले गेलं नाही. कर्ज माफीची यादी समोर आल्यावर हे सगळ स्पष्ट होणार आहे. अवकाळी पाऊस झाल्यावर 25 हजारांची मागणी करणारे हेच लोकं आता सत्तेत आल्यावर ती मदत देण्याचे विसरले. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करू म्हणणारे आता त्यांना चिंतेत टाकत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.