शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 06:09 IST

भंडारा/बीड/अहमदनगर : राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. ...

भंडारा/बीड/अहमदनगर :

राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. भंडारा जिल्ह्यात वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करत तोडफोड केल्याची घटना घडली असून अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक तास रस्त्यावरच ठिय्या दिला, तर बीड जिल्ह्यात पक्ष, संघटनांनी वीज वितरण कार्यालयांपुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रात तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव (भंडारा) येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले. आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त  आहेत.

लोडशेडिंगवरून बीडमध्ये संतापमहावितरणने अचानक सुरू केलेल्या लोडशेडिंगविरोधात जिल्हाभरात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वीज प्रश्नावर भाजपचे तीन आमदार आक्रमक झाले असून इतर पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केज, अंबाजोगाई तालुक्यात वसुली चांगली आणि वीजचोरी नसताना भारनियमन का? असा सवाल आ. नमिता मुंदडा यांनी केला. गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले तर आष्टीत आ. सुरेश धस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. गेवराईत वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला.

बळजबरीने सुरू केला वीजपुरवठावीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीजपुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.

शेतकऱ्यांचा तासभर रस्त्यावरच ठिय्या- शिरूर-जवळे-निघोज मुख्य रस्त्यावर जवळे (ता. पारनेर) येथील बसस्थानकासमोर वीजप्रश्नी शेतकऱ्यांसह भाजपच्यावतीने एक तास रस्त्यावरच ठिय्या देण्यात आला. आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. - भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, भारनियमनासाठी आघाडी सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. विहिरीत पाणी असूनही वीजटंचाईमुळे शेतकऱ्यांची उभे पिके जळून चालली आहेत. आठ दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुणे-नगर महामार्ग गव्हाणेवाडी आम्ही शेतकऱ्यांसह रोखण्याचा इशारा कोरडे यांनी दिला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनelectricityवीज