शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर! सुकाणू समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:50 IST

सरसकट कर्जमाफीपासून टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्याच्या फसव्या घोषणा करणाºया सरकारचे श्राद्ध घालून, ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मंगळवारी दिला आहे.

 मुंबई -  सरसकट कर्जमाफीपासून टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्याच्या फसव्या घोषणा करणाºया सरकारचे श्राद्ध घालून, ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मंगळवारी दिला आहे. मुंबई मराठीपत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, शिवाय नोव्हेंबर महिन्यात सरकारचे श्राद्ध घालून ‘जेलभरो’ आंदोलनाची घोषणा केली आहे.शब्दांचे खेळ करणारे सरकार हमीभाव ठरविण्यात आणि कर्जमाफी देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचे सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकारच्या विरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावरउतरणार आहेत. सरकारने ८९ लाख शेतक-यांना कर्जमुक्तीचा फायदा देण्याची घोषणा केली. मात्र, अर्ज भरताना समाविष्ट केलेल्या जाचक अटींमुळे केवळ ५५ लाख अर्जच दाखल झाले. सरकारने जाणीवपूर्वक ३४ लाख शेतकºयांनाकर्जमाफीपासून दूर केले. त्यातही प्रत्यक्षात २ लाख ३७ हजार शेतक-यांनाच मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप केले आहे. म्हणजेच केवळ ३ टक्के शेतक-यांना कर्जमुक्तीचा फायदा मिळत असून, लाखो शेतकरी कर्जमुक्तीपासून दूरच आहेत. एकंदरीतच सरकारने ऐतिहासिक कर्जमुक्तीचा दावा केला. मात्र, अटी व शर्थींमुळे शेतकºयांना न्याय मिळालेला नाही.ज्येष्ठ नेते बाबा आढाव म्हणाले की, नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरला सरकारचे राज्यभर श्राद्ध घातले जाईल, तर संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळावा, म्हणून १० नोव्हेंबरला प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चे काढले जातील. या वेळी शेतकरी हमीभाव न मिळालेला शेतमाल शासनाच्या दारात ओतून निषेध व्यक्त करेल. सोबतच तहसील कार्यालयाबाहेर घंटानाद करून, सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न करेल, तरी सरकारने जाचक अटी रद्द करत सरसकट कर्जमाफी देण्याची एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी केली. वीजकंपन्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार!शेतक-यांमध्ये नाराजीची भावना असून, वीजभरणा न करणा-या शेतक-यांची वीजजोडणी तोडण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, १ नोव्हेंबरपासून वीजतोडणी करणा-या कंपन्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून, शेतकरी स्वत:चवीजजोडणी करतील, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. ...तर जेलभरो१ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत केलेल्या विविध आंदोलनानंतरही सरकार वठणीवर आले नाही, तर पुढच्या टप्प्यात हजारो शेतकरी गावोगावी ‘जेलभरो’ आंदोलन करतील, असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. मुंबईसह शहरांतीलनागरिकांनी या वेळी बघ्याची भूमिका घेऊ नये. सर्वांनी शेतकरी आंदोलनात सामील होण्याचे आवाहनही सुकाणू समितीने केले आहे.या आहेत शेतक-यांच्या प्रमुख मागण्या- सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा.- वीज बिलाची बेकायदेशीर वसुली थांबवत वीजबिल माफी द्या.- शेतक-यांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घ्या.- दूध व्यवसायाला ७०:३० चे सूत्र लागू करून दुधाच्या दरात वाढ करा.- कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांना किमान १० लाख रुपयेभरपाई देऊन ठोस उपाययोजना करा.- उत्पादन खर्च पाहता उसाला किमान ३ हजार ५०० रुपये प्रतिटन भाव द्यावा.- सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये किमान हमीभाव जाहीर केला असतानाही १ हजार९०० ते २ हजार ६०० रुपये दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आधारभूतखरेदी केंद्र सुरू करा.

टॅग्स :Farmerशेतकरी