शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:04 IST

शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत.

बारामती : कृषि कायद्यामध्ये जरुर सुधारणा सुचवाव्यात,मात्र, हे कायदे रद्द झाल्यास शेतकऱ्याच्या पायातील बेड्या सुटणार नाहीत. कायदे मागे घेण्यासाठी सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्याला गुलाम बनवुन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी सुरु आहे. शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत अशी टीका शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  काही नक्षलवादी विचारसरणीचे दहशतवाद माजविणारे यामध्ये घुसले आहेत.परंतु महाराष्ट्रातील जनता,इतर राज्य मोदींच्या मागे असल्याचा दावा शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला.

बारामती येथे खोत हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी (दि २) आले होते.यावेळीअशी टीका शेतकरी नेते  न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खोत पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावाने काहीजण गळे काढत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना काय वागणुक दिली याचा तपास करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे जाणते नेते पुतनामावशीचे प्रेम दाखवतात,असा टोला शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी लगावला.

शेतकरी नेते शरद जोशी आणि महेंद्रसिंग टीकेत यांनी ३२ वर्षापुर्वी दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  आंदोलन उभे केले होते.त्यावेळी महेद्रसिंग टीकेत यांनी गुंडागर्दी करणारे लोक हाताशी धरत जोशी ना व्यासपीठावरुन ढकलुन दिले.सरकारने आंदोलन मोडीत काढले.त्यावेळी लाखो शेतकरी त्यावेळी माघारी परतला.राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रु पाहुन मला या घटनेची आठवण झाली. जातीवंत शेतकरी दंगा करु शकत नाही,या मताशी मी सहमत आहेत. मात्र, राकेश टीकेत त्यांच्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला तिलांजली देत आहेत. भावनेवर लोक जमा झाले आहेत.मात्र, हे लोक शेतकऱ्यांचे बाजारपेठेच स्वातंत्र्य हिरावुन घेत आहेत.

कृषि कायद्यात सुधारणा व्हावी,ही भूमिका रयत क्रांती संघटनेचा शेतकरी नेता म्हणुन आहे.अत्यावश्यक वस्तु कायदा पूर्ण रद्द करा, शेतमाल निर्यातीवर बंधन लावु नका,अनावश्यक शेतीमान आयात रद्द करा,आदी  आमच्या मागण्या असल्याची भूमिका खोत यांनी केली.

 

टॅग्स :BaramatiबारामतीSadabhau Khotसदाभाउ खोत delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारSharad Pawarशरद पवार