शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कृषी उत्पादक कंपन्या करणार कांदा खरेदी : महा-एफपीसीचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:53 IST

गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहेत.

ठळक मुद्देदोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचा संकल्प राज्यात २५ हजार टन क्षमतेचे साठवणूक केंद्र उभारणारपहिल्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद आणि बीड येथे खरेदी केंद्र आंतरराज्य व्यापाराला चालना देण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीचे अनुदान देण्यात येणार

पुणे : कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर माल टाकून देऊ लागले आहेत. त्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर रोखण्यासाठी शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सोडला. त्यामुळे, बळीराजाच्या मदतीला बळीराजानेच स्थापन केलेल्या कंपन्या धावून आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहेत. सोमवारी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतवारीनुसार क्विंटलमागे ४०० ते ११०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याला भाव मिळत नसल्याने मोफत कांदा वाटपाचे आंदोलनही शेतकऱ्यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी पुण्यात झाली. त्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी करुन तो कांदा लागवड कमी असलेल्या अथवा नसलेल्या ठिकाणी विकावा असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महा-एफपीसीच्या वतीने देण्यात आली.शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने कांद्याच्या आंतरराज्य व्यापारासाठी विक्री साखळी उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद आणि बीड येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील. त्यानंतर कांदा उत्पादन नसणाºया राज्यात त्याची विक्री केली जाईल. चेन्नई येथे दक्षिण भारतातील व्यापार केंद्र सुरु करण्यात आले असून, घाऊक बाजार अणि संस्थात्मक खरेदीसाठी व्यापार सुरु करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचे उद्दीष्ट आहे. आंतरराज्य व्यापाराला चालना देण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पणन मंडळाच्या मदतीने व्यापार प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यातील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बाजारात कांद्याची विक्री होईल. तसेच राज्यात २५ हजार टन क्षमतेचे साठवणूक केंद्र उभारले जाईल. त्यामुळे उन्हाळ्यात देखील कांद्याचे दर टिकवता येतील. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने कांद्याची उत्पादकता घटून उत्पादन कमी होणार आहे. आंध्रप्रदेशातील कांदा आवक कमी होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिना अखेरीस येथील कांदा आवक थांबेल. तर, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील आवक जानेवारी महिना अखेरीस कमी होते. या दरम्यान दक्षिण आणि उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन महाएफपीसीतर्फे करण्यात आले आहे.  

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारPuneपुणे