शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेले कुटुंब ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:35 IST

Rain in Beed:

बीड - परळी, तालुक्यातील बोधेगाव येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ढगफुटी सारखा पाऊस झाला.आणि या मुळे बोधेगावच्या  ओढ्यास  पाणी आले. ओढ्याच्या   पाण्यात अडकलेल्या एका कार मधील तिघांना आपला स्वतः चा जीव धोक्यात घालून बोधेगाव चे माजी सरपंच व परळी कृषी उत्पन्न बाजार समिती  समितीचे संचालक माऊली गडदे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले..     बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जोरदार  पाऊस सुरू झाला.बोधेगाव  जवळील ओढ्यातील पाण्यात  कार  फसली आणि त्या मध्ये सिझर झालेली महिला, पाच दिवसाचे बाळ व एक महिला होते .या कारमध्ये स्टीरिंग पर्यंत पाणी साचले होते. कारमध्ये महिला व पाच दिवसांच्या बाळासह आई कारच्या टपावर थांबलेले होते .अशा अवस्थेत माऊली गडदे  यांनी पाऊस चालू असताना आपल्या स्वतच्या कार मध्ये जीवाची परवा न करता मदतीला धावून गेले..व बोधेगावच्या  ग्रामस्थांना बोलविले..ट्रॅक्टर मधून लोक मदतीला धावले.  ओढ्याच्या पाण्यात येवून त्या तिघाना सुखरूप बाहेर काढले.. कार रात्री झाडाला बांधूनच ठेवली..गुरुवारी पहाटे ओढ्याचे पाणी ओसरले..अंबाजोगाई येथील रुग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाला घेऊन आई व एक महिला बोधेगाव मार्गे स्वतः कारने  आपल्या कासार बोडका या गावी जात असताना त्यांना पावसाने बोधेगाव जवळ झोडपले. ही माहिती सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यांना विघ्ने यांना समजली. विघ्ने  यांनी बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गडदे यांना फोन करून त्या कुटुंबांना वाचविण्याचे आवाहन  केले व माऊली गडदे यांनी स्वतः पहिल्यांदा जाऊन घटनास्थळी आरडाओरडा करुन गावकऱ्यांना बोलून घेतले  व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना मदत कार्य केले. 

बोधेगाव परिसरात बुधवारी रात्री तुफान पाऊस झाला, आपण पहिल्यांदाच एवढा मोठा स्वरूपाचा पाऊस पाहिला  .या पावसाच्या पाण्यात एक कार अडकली होती  .कार मध्ये तिघेजण होते या तिघांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.- माऊली गडदे(  माजी सरपंच बोधेगाव.परळी)

टॅग्स :RainपाऊसBeedबीड