शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

कुटुंबातील मारहाणीमुळे मुले बनतात हिंंसक

By admin | Updated: July 3, 2017 08:47 IST

शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात.

संजय पाठक/ आॅनलाइन लोकमतनाशिक : शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात... आपण मुलांना शिस्त लावत असतो, असे पालकांचे मत असते आणि ते समाजमान्यही असते. परंतु अशाप्रकारची मारहाणही मुलांवर प्रतिकूल परिणाम करणारी ठरत असून, त्यामुळे मुले हिंसक होतात, असा निष्कर्ष एका पाहणीत निघाला आहे.बालहक्क आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या युनीसेफच्या नाईन इज माईन तसेच मुंबईतील चरखा या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, यवतमाळ, नंदुरबार, जालना, लातूर अशा सात जिल्ह्यांत नुकताच एक सर्व्हे करून मुलांवरील अत्याचार तसेच त्याचा त्यांच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधन करण्यात आले.

सात जिल्ह्यांत १३ ते १७ वयोगटातील सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थांनी तयार केला असून, चरखा संस्थेच्या अंजली गाडगीळ यांनी याबाबत माहिती दिली. मुलांना घरात आई-वडील किंवा अन्य मोठ्या व्यक्तींनी मारणे, त्याचप्रमाणे शाळेत शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मारणे यांसह रोजगाराच्या ठिकाणी होणारी मारहाण, हिंंसा, दुर्लक्षित करून केला जाणारा मानसिक छळ तसेच रोजगाराच्या ठिकाणी होणारे आर्थिक शोषण याबाबत संशोधन करण्यात आले.

मुले ऐकत नाही किंवा त्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली पालकांकडून मारहाण केली जाते. त्यातून मुले हिंसक आणि गुन्हेगारीकडे वळतात, असे मुलांच्या चर्चेतून निष्पन्न झाले. या सर्वेक्षणात २५ टक्के मुलांना आई मारहाण करते. २१ टक्के मुलांना वडील मारहाण करतात, असे आढळले आहे. १७ टक्के मुलांना दुसऱ्या मुलांकडून मारहाण झाल्याचे आढळले आहे. २५ टक्के मुलांना चापटीने मारहाण झाली. ६ टक्के मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण होते. तर २ टक्के चटके दिले जातात. मुले शाळेत जाणे टाळतात...शाळांमध्येदेखील मुलांना मारहाण होते. यातील ५९ टक्के मुलांना शारीरिक तसेच मानसिक शोषणाची भीती असते. ५२ टक्के मुलींना दुर्लक्ष करून उपेक्षित ठेवले जाते. ६४ टक्के मुलांना शिक्षणासाठी नाउमेद केले जाते. तर ५२ टक्के मुलांची अन्य मुलांशी तुलना केली जाते. अशा अनेक प्रकारांमुळे मुले शाळेत जाणेच टाळतात. शाळेत शौचालय नाही म्हणून शाळेत जाण्याची मानसिकता नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.लैंगिक अत्याचाराचे बळीकुटुंबात केवळ मारहाणच नव्हे तर लैंगिक अत्याचार होतात. दहा टक्के लैंगिक अत्याचार वडिलांकडून तर ६ टक्के अत्याचार आईकडून होत आहे. याशिवाय कुटुंबातील भाऊ, बहीण, आजी-आजोबा, काका अशा व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याचे आढळले आहे.मुलांना शिस्तीसाठी मारणे किंवा अन्य अत्याचार केले जातात. त्याकडे माध्यमांपासून सर्वच दुर्लक्ष करतात. केवळ मुलींवर बलात्कार झाला तर तेवढीच दखल माध्यमे घेतात. परंतु कुटुंबातील मारहाण मुलांवर किती परिणामकारक ठरू शकते, हे सर्वेक्षणातून दिसून आले.- अंजली गाडगीळ, चरखा