शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘डॉक्टरांच्या माथी संघर्ष पाचवीला पुजलेला’

By admin | Updated: July 1, 2016 02:45 IST

डॉक्टर म्हणजे प्रतिष्ठा, पैसा हे सर्वसाधारण समीकरण सर्वांच्याच मनात असते.

मुंबई : डॉक्टर म्हणजे प्रतिष्ठा, पैसा हे सर्वसाधारण समीकरण सर्वांच्याच मनात असते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. डॉक्टर बनण्यापासून ते थेट व्यवसायात जम बसेपर्यंत आणि त्यानंतरही पुढे डॉक्टरी पेशाचा संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने या संघर्षाचा घेतलेला हा आढावा...डॉक्टर शहरी भागाला पसंती देतात, ग्रामीण भागात जात नाहीत, असे अनेक गैरसमज आहेत. पण डॉक्टर होण्यासाठी प्रवेशापासून सुरू झालेला संघर्ष पुढे कित्येक वर्षे सुरूच राहतो. आजही प्रस्थापित ज्येष्ठ डॉक्टर हे हक्कांसाठी वैद्यकीय व्यवसायाला लागलेल्या बोगस पॅ्रक्टिसच्या ग्रहणाविरुद्ध लढा देत आहेत. सध्या अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचा लढा हा क्रॉसपॅथीविरुद्ध सुरू आहे. तर पॅथॉलॉजिस्ट हे बोगस पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध तर रेडिओलॉजिस्ट आणि स्त्रीरोगतज्ज्ञ हे पीसीपीएनडीटी कायद्यात बदल व्हावेत, म्हणून लढा देत आहेत. बारावीच्या परीक्षेनंतरही एमएचसीईटी, नीटसारख्या प्रवेश परीक्षांसाठी राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, त्यापैकी फक्त ५ हजार ८०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यानंतर पुढची साडेपाच वर्षे एमबीबीएस होण्यात जातात. पुढचे एक वर्ष या डॉक्टरांना ग्रामीण भागात जाऊन काम करण्याचा बॉण्ड पूर्ण करावा लागतो. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या डॉक्टरांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेसाठी अनेक डॉक्टरांचे एक वर्ष जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राज्यात फक्त ६०० ते ७०० जागा आहेत. या अभ्यासक्रमासाठी त्यांची तीन वर्षे आणि एक वर्षाचा बॉण्ड धरून चार वर्षे घालवावी लागतात. त्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टर होण्यासाठी सुमारे १० ते ११ वर्षांचा कालावधी लागतो. १८ ते ३० वर्षे डॉक्टर शिक्षणासाठी खर्च करतात, अशी वस्तुस्थिती मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी मांडली. तिसाव्या वर्षी डॉक्टरने एखाद्या रुग्णालयात नोकरी केली तर तीन ते चार वर्षांनी तो स्थिरावू शकतो. पण, स्वत:चा दवाखाना, रुग्णालय, लॅब, सेंटर सुरू करायचे असल्यास पैशांची आवश्यकता असते. पण, तिसाव्या वर्षी कर्ज घेताना नॅशनलाइज बँक या डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत. अशा वेळी डॉक्टरांना को-आॅपरेटिव्ह बँक किंवा पतपेढीतून कर्ज घ्यावे लागते. याचा व्याजदर हा १७ ते १८ टक्के इतका असतो. त्यामुळे पुढची किमान पाच वर्षे ही कर्ज फेडण्यात जातात. तोपर्यंत डॉक्टरचे वय सरासरी ३५ ते ३७ इतके झालेले असते. या वयात तो स्थिरावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा वैद्यकीय व्यवसायात पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे त्याला शक्य होत नाही. कारण, त्याच्या आजूबाजूला वैद्यकीय व्यवसायात सुरू असलेली बेकायदेशीर कामे त्याला स्थिरावू देत नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी सांगितले.निम्म्याहून अधिक डॉक्टरांना पुन्हा ग्रामीण भागात, त्यांच्या घराजवळ जाऊन प्रॅक्टिस करायची असते. पण या भागातील परिस्थितीचा सारासार विचार केल्यास त्यांना ते शक्य होत नाही. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात आणि या भागांत अधिक प्रमाणात न शिकलेल्या व्यक्ती ठाण मांडून बसलेल्या असतात. अशा व्यक्तींशी झगडावे लागते. राज्यातील सर्व पॅथॉलॉजिस्ट सध्या बोगस पॅथॉलॉजिस्टविरुद्ध लढा देत आहेत. पीसीपीएनडीटी कायद्याच्या जाचक अटींमुळे रेडिओलॉजिस्टना प्रॅक्टिस करणे सध्या असह्य झाले आहे. याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर रेडिओलॉजिस्टना न्याय मिळेल, असा आशेचा किरण दिसून येत आहे. पण, जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नाही, असे रेडिओलॉजिस्टचे म्हणणे आहे. या वर्षांमध्येही शिक्षण घेताना अपुऱ्या सुविधांमुळे या डॉक्टरांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईसारख्या ठिकाणीही राहण्याची समस्या असते. त्याचबरोबरीने कामाच्या अनियमित वेळा त्यांचा पिच्छा पुरवतात. सध्या अजून एका समस्येला सामोरे जावे लागत आहे. ती म्हणजे चूक नसतानाही रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी मारहाण. सेवा देण्याची इच्छा असते, पण त्यासाठी पोषक वातावरण दिसून येत नसल्याचेही डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले.‘क्रॉसपॅथीचा लढाही महत्त्वाचा’सध्या सर्वांत महत्त्वाचा मुद्दा अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना सतावत आहे, तो म्हणजे क्रॉसपॅथीला मिळणारी परवानगी. परदेशात क्रॉसपॅथीला विरोध होत आहे. क्रॉसपॅथीची प्रॅक्टिस करणे काही देशांमध्ये मान्य नाही. पण देशात अशी प्रॅक्टिस सुरू झाल्यास डॉक्टरांपेक्षा रुग्णांना याचा मोठा फटका बसणार आहे. फार्माकोलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करून अ‍ॅलोपॅथीची औषधे देणे योग्य नाही. त्यामुळे क्रॉसपॅथीला सर्वच शाखांमधील डॉक्टरांचा विरोध आहे.