शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Fake Currency LIVE DEMO : १० मिनिटात १०० रूपयांची बनावट नोट! लाइव्ह प्रात्यक्षिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 19:39 IST

सर्व दुकानदार दोन हजार, एक हजार व पाचशेच्या नोटा तपासून घेत असल्याने एका रिक्षाचालकाने शक्कल लढवत १०० रूपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे.

उल्हासनगर : सावधान...तुमच्या हातातील शंभराची नोट खरंच खरी आहे...ती बनावट तर नाही ना...काळजी घ्या...कुणीही नोट दिली तर आधी तपासा...कारण ऑनलाइन लोकमत तुमच्यासाठी अलर्ट जारी करतंय...शंभर रुपयाची नोट...फक्त दहा मिनिटात...तेही फारसं काहीच कष्ट न करता...विश्वासच बसणार नाही...पण ऑनलाइन लोकमत तुम्हाला दाखवतेय बनावट नोट बनवण्याचं थेट प्रात्यक्षिकच...

सर्व दुकानदार दोन हजार, एक हजार व पाचशेच्या नोटा तपासून घेत असल्याने एका रिक्षाचालकाने शक्कल लढवत १०० रूपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे. घरीच थाटलेल्या या कारखान्यात हा रिक्षाचालक १० मिनिटात शंभरची नोट बनवायचा. तो एका महिलेच्या मदतीने शहरातील मार्केटमध्ये या बनावट नोटा चलनात आणायचा. याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर या आरोपीने पोलिसांसमोर १० मिनिटात बनावट शंभराची नोट बनवण्याचा डेमो दाखवत आपला गुन्हा कबूल केला आहे.

राकेश इशराणी (३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून राकेश हा सध्या पोलिस कोठडीत आहे. तो गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राहत्या घरीच शंभराच्या बनावट नोटा तयार करत असल्याचे पोलीस चौकशीत आढळले. त्याकरता त्याने लोनवर १ प्रिंटर देखील आणले होते. आरोपी राकेश पूर्वी रिक्षा चालवत असताना त्यांची ओळख महिला आरोपी मिता मलानी सोबत झाली. बनावट नोटा चलनात आणायचे मार्गदर्शन या महिलेला करत तो तिला ५० टक्के कमिशन देत होता. मिता ही गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन त्या नोटा चालवण्याचे काम करायची. त्या दोघांनी मार्केटमध्ये जवळपास ५० हजारांहून अधिक रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे पोलिसांना तपासात समजले आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री पोलिसांनी राकेशकडून जप्त केली आहे.आरोपी मिता व राकेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास स.पो.नि. सालगुडे करत आहेत.

पाहा व्हिडीओ -