शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:43 IST

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप आहे, वेगळा विचार करता येईल,’ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आणि गुरुवारी दोघांमध्ये २० मिनिटे वन टू वन बंदद्वार चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे दोन नेते एकमेकांना भेटले. एरवी या दोघांमधील कटूता, एकमेकांवर सातत्याने टीका करणे, हे सर्वविदित असताना आजची भेट ही कालच्या ऑफरचा टप्पा दोन होती का? अशी चर्चा विधानभवनात रंगली.

उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र येण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी मराठी विजय मेळाव्यात जाहीरपणे म्हटले होते. मात्र, गेले काही दिवस दोन्ही भावांनी एकत्र येण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभप्रसंगी विधान परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे यांना दिलेली ऑफर चर्चेचा विषय ठरली होती. त्याला २४ तासही होत नाहीत तोच दोघांनी बंदद्वार चर्चा केल्याने पुढे काही राजकीय बदल होतील का? असे राजकीय वर्तुळात चर्चिले जाऊ लागले आहे.

पुस्तक दिले भेटया भेटीनंतर सभापती राम शिंदे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदीची सक्ती कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट म्हणून दिले. मराठीचा आग्रह धरतानाच हिंदीची कोणतीही सक्ती करण्याची गरज का नाही, याबाबतचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेत्याची विनंती : विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचा शुक्रवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किमान आता तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी आम्हाला द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आजच्या भेटीत फडणवीस यांना केली. या पदासाठी भास्कर जाधव यांना संधी देण्याचा आग्रह ठाकरे यांनी धरल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी जाधव यांच्या नावाची घोषणा होणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा