शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-शिंदे यांची बडोद्यात शहांशी चर्चा! सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र केला इन्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 06:11 IST

दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री बडोदा (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. फडणवीस हे संध्याकाळच्या सुमारास आधी इंदूरला (मध्य प्रदेश) गेले. तेथे ते दोन तास देवदर्शनासाठी थांबले आणि तिथून विमानाने बडोद्याला पोहोचले. गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे हे रात्री बडोद्याला पोहोचले. दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बातमी बद्दल एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नकार किंवा हाेकार कळवलेला नाही. 

त्याची पुनरावृत्ती नको- २०१९ मध्ये फडणवीस-अजित पवार सरकारचा प्रयत्न फसला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. -  एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात परत जाणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी शहा यांना यावेळी दिल्याचे सांगण्यात येते.- यानंतर फडणवीस शनिवारी सकाळी मुंबईला परतले तर शिंदे सकाळी गुवाहाटीला रवाना झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अशी भेट झाल्याचा इन्कार केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGujaratगुजरातShiv SenaशिवसेनाBJPभाजपा