शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नकारात्मक प्रसिद्धीची फडणवीस सरकारला धास्ती, बातमी येताच तत्काळ खुलासा करण्याचे आदेश

By यदू जोशी | Updated: September 16, 2017 04:46 IST

 मुंबई : प्रसारमाध्यमांमधून सरकारबद्दल येणा-या नकारात्मक बातम्यांचे स्पष्टीकरण ताबडतोब करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्र मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सर्व विभागांना पाठविले आहे. तत्काळ खुलासा केला नाही तर ती अनियमितता समजण्यात येईल, असे या पत्रात बजावण्यात आले आहे.येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत असलेले ...

 मुंबई : प्रसारमाध्यमांमधून सरकारबद्दल येणा-या नकारात्मक बातम्यांचे स्पष्टीकरण ताबडतोब करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्र मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सर्व विभागांना पाठविले आहे. तत्काळ खुलासा केला नाही तर ती अनियमितता समजण्यात येईल, असे या पत्रात बजावण्यात आले आहे.येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत असलेले फडणवीस सरकार तीन वर्षांतील उपलब्धींची सकारात्मक प्रसिद्धी करण्याची जोरदार तयारी करीत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी होत असताना गैरसमजावर आधारित एखाद्या बातमीमुळे जनमानसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यास विभागांना सांगण्यात आले आहे. एखाद्या विभागाविषयी नकारात्मक बातमी आलेली असेल तर ती संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाºयांवर टाकण्यात आली आहे. खुलासा टपालाद्वारे पाठवू नका. ई-मेलनेच पाठवा, असेही बजावण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे बाकी असताना देवेंद्र फडणवीस सरकार हे प्रसिद्धीबाबत अधिक सजग व संवेदनशील झाले आहे. सरकारवरील प्रत्येक टीका, आरोपांचा इन्कार खुलाशांद्वारे करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात खुलाशांबाबत असा दबाव कधीही नव्हता, असा अनुभव एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितला.अधिकारी धास्तावलेलेप्रसिद्धी माध्यमांना तत्काळ खुलासा पाठवा, तो मिळाला की नाही याची खात्री करा, त्याला प्रसिद्धी मिळेल यासाठी पाठपुरावा करा, असे आदेश माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकाºयांना देण्यात आले आहेत.त्यामुळे सध्या ते सगळे ‘खुलासा अधिकारी’ बनले आहेत. ‘आली बातमी की कर खुलाशाची सोय’ अशी आमची अवस्था असल्याचे एक अधिकारी म्हणाले.फक्त मीच बोलणार...फडणवीस सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्या विभागात स्पष्टच बजावले आहे की त्यांच्याशिवाय प्रसिद्धी माध्यमांशी कोणीही बोलणार नाही. त्यांच्या विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे आणि एखाद्या विषयावरील सरकारची भूमिका आणि ज्येष्ठ अधिकाºयांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली माहिती यात बरेचदा विसंगती आढळते.एका बातमीबाबत या विभागाच्या मंत्रालयात बसणा-या सचिवांना विचारले असता, ‘मंत्रिमहोदयांशिवाय कोणीही बोलणार नाही असे आम्हाला आदेश आहेत. त्यामुळे मी बोलू शकत नाही,’ असे हे सचिव म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस