शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह दक्षिणेच्या राज्यांत मुसळधारेचा इशारा; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 06:00 IST

केरळमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यातील पतानमतिथा, कोट्टायम, इडुकी, मलप्पुरम, वायनाड यासह आणखी काही जिल्ह्यांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी व गोवा तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ व कर्नाटकच्या किनारपट्टी भागात रविवारपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

केरळमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यातील पतानमतिथा, कोट्टायम, इडुकी, मलप्पुरम, वायनाड यासह आणखी काही जिल्ह्यांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी उत्तर केरळमध्ये अनेक ठिकाणी संततधार बरसत होती. त्यामुळे तिथे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. कासारगोड परिसरात दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले. महाराष्ट्र व गोव्यामध्ये काही ठिकाणी रविवारपासून बुधवारपर्यंत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

तामिळनाडूच्या दक्षिण भागात कोईंबतूर, सालेम, धर्मपुरी, पेराम्बलूर येथे मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या राज्याच्या उत्तर भागातील किनारपट्टी प्रदेशातही सोमवारी जोरदार पाऊस होईल. कर्नाटकातील बहुतांश भागात सोमवारी, मंगळवारी संततधार बसरणार आहे. त्याचप्रमाणे बिहार, आसाम, पश्चिम बंगालमधील काही भागांतही संततधार बरसण्याची शक्यता आहे. 

ओमानमध्येही इशाराशाहिन चक्रीवादळ सोमवारी सकाळी ओमानचे आखात ओलांडणार आहे. त्यावेळी दर ताशी ८० ते ९० किमीच्या वेगाने त्या परिसरात वारे वाहतील. त्यामुळे ओमानच्या किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस