शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी ; गुरुवारी पुण्यातील तापमान ९.८ अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 21:05 IST

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट

पुणे : विदर्भात गेले काही दिवस किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यानंतर आता काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ४.९ अंश सेल्सिअसने घटले आहे. 

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात घट नोंदविली गेली आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका असणार त्यानंतर मात्र हळूहळू कमी होत जाणार आहे. सोमवारनंतर किमान तापमान सरासरीच्या जवळपास येण्याची शक्यता आहे. 

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ९.८, लोहगाव १२.२, जळगाव १०.७, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १३.४, नाशिक १०.४, सांगली १४.१, सोलापूर १५.२, मुंबई २२.८, सांताक्रुझ १९.८, रत्नागिरी १७.५, पणजी १९, डहाणु १८.८, औरंगाबाद १२.८, परभणी १३, नांदेड १५.५, बीड १२.९, अकोला १३.४, अमरावती १४.१, बुलढाणा १४.२, ब्रम्हपुरी१९.६, चंद्रपूर ११.२, गोंदिया १४.५, नागपूर १८.३, वाशिम १४, वर्धा १६.८़

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आली आहे. गुरुवारी शिवाजीनगर येथे ९़८ अंश या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली़ लोहगाव येथे १२़२ आणि पाषाण येथे ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी कमाल तापमानातही घट होऊन बुधवारी २९़६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात काहीशी वाढ होऊन कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३० व ११ अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान