शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ! उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:40 IST

सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने

मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने, आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.मुंबई विद्यापीठाने शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाचे काही निकाल जाहीर केले, पण या निकालातही मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला आहे. आतापर्यंत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे समोर आले आहे.पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी अभ्यासक्रमाचे गुण अनिवार्य आहेत, पण सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचे गुण समजलेले नाहीत. संकेतस्थळावर आता विद्यार्थ्यांना निकाल समजणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, पण तरीही अनेक विद्यार्थ्यांना निकाल दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, या सर्व गोंधळानंतर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने, विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास -मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू असलेला गोंधळ अजूनही संपलेला नाही. विद्यापीठाने आतापर्यंत ४००हून अधिक निकाल जाहीर केले असले तरी तरी त्यातही अनेक विद्यार्थी नापास आहेत. काहींना शून्य गुण देण्यात आला आहे. पण, याचे खरे कारण म्हणजे या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे समोर येत आहे.मुंबई विद्यापीठ यंदा १६०वे वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे विद्यापीठाने काही नवीन उपक्रम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला डिजिटल करण्यासाठी तसेच निकाल जलद लावण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असतानाच यंदापासून उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होईल अशी घोषणा केली. आॅनलाइन तपासणीमुळे लवकर निकाल लागतील असा विश्वास कुलगुरूंना होता.प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्यातही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे चौकशी केल्यास उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे सांगितले जाते. स्कॅनिंग प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतरत्र गेल्याची भीती आहे. यावर आता विद्यापीठ काय तोडगा काढणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थी