शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:57 IST

प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार

मुंबई : शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, तसेच प्रत्येक पालकमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्राधान्याने राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना बुधवारी केले.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमा’चा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले. 

शासन कटिबद्धदिवाळी जवळ आली असताना ‘नमो ११ कलमी कार्यक्रमा’चा शुभारंभ  होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर  महापालिका व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ यशस्वीपणे राबविणार आहोत, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

सर्व घटकांना लाभ : फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करीत आहोत. कामगार, महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चित मदत करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे