शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीक २००० वर्षांपूर्वी निर्यातीचे केंद्र; माहुरझरीच्या मण्यांचा आफ्रिका, इजिप्तशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:27 IST

Nagpur : १९३३ साली त्यांनीच माहुरझरीत सापडणाऱ्या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी संबंध असल्याचे नमूद केले.

- निशांत वानखेडे

नागपूर : नागपूरपासून अवघ्या १५-२० किलाेमीटरवर गाेरेवाडालगतच्या माहुरझरी गावात उत्खननातून प्राचीन मणी व इतर साहित्य माेठ्या प्रमाणात सापडत आहेत. या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी साधर्म्य असल्याने २००० वर्षांपूर्वी हे ठिकाण मणी व साैंदर्य प्रसाधन निर्यात केंद्र असावे, असा अंदाज पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.पुरातन वारसातज्ज्ञ व विदर्भ संशाेधन मंडळाचे अधिकारी डाॅ. शेषशयन देशमुख यांनी या प्राचीन अवशेषांबाबत माहिती दिली. माहुरझरीचे महत्त्व सर्वात आधी ब्रिटिश पुरातत्व तज्ज्ञ हंटर यांनी अधाेरेखित केले हाेते. १९३३ साली त्यांनीच माहुरझरीत सापडणाऱ्या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी संबंध असल्याचे नमूद केले. सापडलेले मणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि जगाच्या सर्व भागात दिसतात. त्यामुळे प्राचीन काळी साैंदर्यप्रसाधनाचे हे निर्यात केंद्र असावे, असा दावा त्यांनी केला हाेता.पुरातत्त्व विभागाचे उत्खनन१९७०च्या काळात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुरातत्त्व विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाकडून इथे उत्खनन सुरू केले हाेते. तेव्हापासून मण्यांसह प्राचीन विटा, लज्जा गाैरीचे शिल्प, स्टाेन सर्कल, प्राचीन वसाहतीचे चिन्ह आणि महापाषाण संस्कृतीचे अवशेषही सापडत आहेत.

सातवाहनकालीन बांधकामाचे अवशेष-नुकतेच माहुरझरी-सावनेर रस्त्याच्या कामाच्या वेळी खाेदकाम करताना प्राचीन विटा या भागात सापडल्या. त्यांनी लगेच पुरातत्त्व विभागाला माहिती दिली. त्यामुळे विभागाने आता नव्याने उत्खनन सुरू केले आहे. - विटा, मातीचे मडके व दाेन ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे अवशेष येथे सापडत आहेत. हे सर्व वाकाटक काळासह सातवाहन काळातील अवशेष असल्याचा विश्वास अभ्यासकांना आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर