घटस्फोटित तरुणीचे पोलिसाकडून शोषण

By Admin | Updated: May 1, 2015 02:05 IST2015-05-01T02:05:26+5:302015-05-01T02:05:26+5:30

घटस्फोटित तरुणीला एका विवाहित पोलीस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या नावावर तब्बल दीड वर्ष तिचे शारीरिक शोषण केले आणि ऐनवेळी लग्नाला नकार दिला.

Exploit of a divorced policeman | घटस्फोटित तरुणीचे पोलिसाकडून शोषण

घटस्फोटित तरुणीचे पोलिसाकडून शोषण

जळगाव : ‘खाकी वर्दी’ला मान खाली घालायला लावणारी व मन सुन्न करणारी घटना जळगाव पोलीस दलात घडली आहे. केसच्या निमित्ताने घटस्फोटित तरुणीला एका विवाहित पोलीस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या नावावर तब्बल दीड वर्ष तिचे शारीरिक शोषण केले आणि ऐनवेळी लग्नाला नकार दिला. बिंग फोडू नये यासाठी पीडित तरुणीला पैशांचे आमिष व प्रसंगी धमक्याही देण्यात आल्या, अशी तक्रार तिने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पीडित तरुणीने ‘लोकमत’ कार्यालयात येऊन पोलिसांना दिलेले निवेदन तर दाखवलेच मात्र आपबितीही कथन केली.
या प्रकरणात एका महिला समाजसेविकेचा समावेश असून तिच्याकडूनही पीडित तरुणीला घरी जाऊन धमक्या दिल्या जात आहेत. न्यायासाठी दाद मागूनही पोलीस दलाच्या बदनामीपोटी पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचाही आरोप तिने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Exploit of a divorced policeman