शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल कोश्यारींकडून अमित शहांना स्पष्टीकरण; शिवरायांच्या अवमानावर काय म्हणाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:23 IST

औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वादळ उठले असून, त्यावरून कोश्यारी हटावची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणत्याही पद्धतीने अवमान करण्याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. तथापि, आपल्या भाषणातील संदर्भ तोडून आपल्यावर टीका केली गेली, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

औरंगाबाद येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांविषयी केलेल्या विधानावरून सध्या वादळ उठले असून, त्यावरून कोश्यारी हटावची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

मी शिकत असताना विद्यार्थी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत आणि उदाहरणेही देत असत. हे सारे आदर्श आहेतच. मात्र, तरुण पिढी सध्याच्या काळातीलही काही आदर्श मानत असतेच. त्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अलीकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात, असे विधान मी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आदर्श समोर असू शकतो; पण याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे असा होत नाही. माझ्या भाषणामध्ये तुलना करणे हा विषयच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे आदर्श आहेत, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. महापुरुषांच्या अवमानाची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी भाषणामधून वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. अशा व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला असे म्हणता येणार नाही.     - भगतसिंह कोश्यारी

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAmit Shahअमित शाह