शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली; आरक्षणानुसार दिलेल्या बढत्या संपुष्टात!

By यदू जोशी | Updated: October 29, 2017 06:00 IST

उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने २००४ पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत.

मुंबई : उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने २००४ पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत.बढत्यांसाठीचा राज्य सरकारने २५ मे २००४ रोजी काढलेला जीआर हायकोर्टाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी घटनाबाह्य ठरवला व त्याबाबत १२ आठवड्यांत कारवाई करावी, असा आदेश दिला. याविरुद्ध राज्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निकालास १२ आठवडे स्थगिती दिली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा २८ मार्च २००८ चा अंतरिम आदेश लागू राहील, असे स्पष्ट केले.त्यानुसार, राज्याने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार असली तरी १२ आठवड्यांची मुदत २७ आॅक्टोबरलाच संपल्याने अंतरिम आदेशानुसार सुरू राहिलेले बढत्यांमधील आरक्षण संपुष्टात आले. उच्च न्यायालयाने ९ मार्च २००७ च्या अंतरिम आदेशात भटके विमुक्त व विशेष मागासवर्गीयांच्या १३ टक्के बढतीत आरक्षण ठेवण्यास अनुमती दिली होती आणि एससी, एसटीच्या बढत्यांना स्थगिती कायम ठेवली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सर्व मागास प्रवर्गांच्या बढत्या आरक्षणानुसार देण्यास २८ मार्च २००८ च्या अंतरिम आदेशानुसार संमती दिली. ती उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढेपर्यंतच होती. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशानुसार राज्यात बढत्यांमधील आरक्षण कायम होते. या नव्या बढत्यांचे भवितव्यही आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल.

टॅग्स :Courtन्यायालय