मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज पंचायत समिती ते महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही खर्चमर्यादा वाढविण्याची मागणी विविध पक्षांनी केलेली होती. आयोगाच्या ३० जुलै २०११ च्या आदेशानुसार यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवाराकरता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. त्यानुसार,अ वर्ग महापालिकांच्या उमेदवारांसाठी पाच लाख रुपये, ब आणि क वर्ग महापालिकांसाठी ४ लाख तर ड वर्ग महापालिकांसाठी ३ लाख रुपये इतकी खर्च मर्यादा होती. जिल्हा परिषदांसाठी ३ लाख तर पंचायत समित्यांच्या उमेदवारांसाठी २ लाख रुपये खर्चाची मर्यादा पूर्वी होती. आता महापालिकांसाठीच्या खर्चाची मर्यादा ही तेथील नगरसेवक संख्येनुसार निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील उमेदवारांचा खर्च हा तेथील गण संख्येनुसार निश्चित करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी) खर्चाची सुधारित मर्यादा (लाखांत)स्थानिक स्वराज्य संस्था खर्च मर्यादामुंबई महापालिका 10 ६५ ते ८५ नगरसेवक संख्या असलेल्या महापालिका 05८६ ते ११५ नगरसेवक संख्याअसलेल्या महापालिका 07११६ ते १५० नगरसेवक संख्याअसलेल्या महापालिका 08१५१ ते १७५ नगरसेवक संख्याअसलेल्या महापालिका 10जिल्हा परिषदा व पंचायत समित्या५० ते ६० निवडणूक विभाग असलेले जिल्हे जि.प. पं.स.०४ ०३६१ ते ७० निवडणूक विभाग असलेले जिल्हेजि.प. पं.स.०५ ३.५७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेले जिल्हेजि.प. पं.स.०४ ०.३
खर्चमर्यादेत वाढ
By admin | Updated: February 2, 2017 00:24 IST