शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी वीज केंद्राचा विस्तार बारगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:02 IST

बिकट आर्थिक स्थिती; नाशिक, परळीतील नवे युनिटही बारगळणार

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा मोठ्या प्रकल्पांना फटका बसायला सुरुवात झाली असून नागपूरनजीकच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा तब्बल नऊ हजार कोटी रुपये खर्चाचा विस्तार प्रकल्प तूर्त बारगळला आहे.कोराडी वीज प्रकल्पात सध्या २४०० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. आणखी प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन युनिट उभे करण्यात येईल, असा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये घेण्यात आला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रकल्प हाती न घेण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर गंडांतर येण्याची शक्यता असून त्याची पहिली टाच विदर्भातील प्रकल्पावर आली आहे.एका मेगावॅटसाठी ७ कोटी रुपये खर्च येतो. १,३२० मेगावॅटसाठी ९,२४० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यातील ३० टक्के म्हणजे २,७७२ कोटी रुपयांचा भार राज्य शासनाला सहन करावा लागला असता आणि अन्य रकमेचे कर्ज वित्तीय संस्थांकडून घेणे अपेक्षित होते. राज्यातील वीज प्रकल्पांमधील ज्या युनिट तीस वर्षांहून अधिक जुन्या आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ते बंद करून त्या ठिकाणी सुपरक्रिटिकल टेक्नॉलॉजी युनिट उभारण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतली होती. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रदूषण होणार नाही, असा दावा करण्यात आला होता. कोराडीतील नवीन युनिटला वीज निर्मिती, महावितरण व पारेषण तसेच होल्डिंग कंपनीने मान्यता दिली होती. नंतर राज्य वीज नियामक आयोगानेही मान्यता दिली होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाने परवा असे प्रकल्प सध्या हाती न घेण्याचे ठरविल्यामुळे कोराडी पाठोपाठ नाशिक, चंद्रपूर, भुसावळ, परळी आदी ठिकाणी सुपर क्रिटिकल युनिटची उभारणी बारगळण्याची शक्यता आहे.कोराडी वीज प्रकल्पाचा विस्तार रद्द करण्यात आलेला नाही. तोस्थगित करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर या विस्ताराला विरोध होता. कोराडीचा विस्तार होणार नसेल तर तेथील प्रकल्प नाशिक किंवा अन्यत्र नेता कामा नये, अशी भूमिका मी मंत्रिमंडळात मांडली. नागपूरनजीक५०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी मी आग्रही आहे.- डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

टॅग्स :electricityवीज