शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशातून मॉन्सूनने घेतली एक्झिट; ऑक्टोबरमध्ये ७ टक्के जास्त कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 19:49 IST

monsoon exit : मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल १०९ टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात १२९ टक्के पाऊस झाला आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून माघारी घेतली असल्याचे भारतीय हवामान विभागाने बुधवारी जाहीर केले. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर ही तारीख आहे. त्यापेक्षा यंदा मॉन्सूनचा मुक्काम १३ दिवस लांबला आहे.

या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत ७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल १०९ टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात १२९ टक्के पाऊस झाला आहे. तर उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थानमधुन २८ सप्टेबरपासून सुरुवात झाली होती. तो मध्य प्रदेशापर्यंत माघारी आला होता. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले वते आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रातून अरबी समुद्राला मिळाले.

याकाळात तेलंगणा व महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्याने मॉन्सूनच्या परतीचा प्रवाह रोखला गेला होता. सप्टेबरनंतरही ऑक्टोबरमध्ये राज्यात पाऊस होत असतो. १ ते २८ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी ६९ मिमी पाऊस पडतो. यंदा ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीच्या तुलनेत तब्बल ७३ टक्के अधिक आहे. कोकणामध्ये १२४ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११९ टक्के आणि मराठवाड्यात ५४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. ऑक्टोबर महिन्यातही विदर्भात सरासरीच्या तुलनेत १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. 

मॉन्सूनच्या माघारीबरोबरच राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. जळगाव येथे आज राज्यातील सर्वाधिक कमाल आणि सर्वात कमी किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.पुणे शहरात ऑक्टोबरमध्ये सातत्याने पाऊस पडत होता़ १ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुणे शिवाजीनगर येथे३१२.४ मिमी पाऊस पडला. तो सरासरीपेक्षा तब्बल२३२.४ मिमीने अधिक आहे. लोहगाव येथे या काळात ३०८.३ मिमी पाऊस पडला. तो सरासरीपेक्षा २२६ मिमीने अधिक आहे. तर पाषाण येथे ३१९.३ मिमी पाऊस झालाआहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018