शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शिक्षण धोरणात हिंसक इतिहास वगळा; उर्दू शिक्षकांचे पंतप्रधानांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 14:45 IST

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शेकडो शिक्षकांनी एकत्र येऊन नव्या शिक्षण धोरणाबाबत २७ कलमी प्रस्ताव तयार केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या मनात जातीभेदाची भावना वाढविणऱ्या इतिहास विषयातील घटना वगळाव्या.नव्या शिक्षण धोरणात ९९ टक्के बाबी चांगल्या असल्या तरी ५ टक्के सुधारणा आवश्यक जेथे प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमात उपलब्ध आहे, तेथील अंगणवाडीही उर्दू माध्यमाची करावी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : नव्या शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम आराखडा तयार करताना आणि तो राबविताना शालेय इतिहासातून हिंसक घटना वगळाव्या, अशी मागणी महाराष्ट्रातील उर्दू शिक्षकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. शिवाय, नव्या धोरणात अल्पसंख्यक समुदायाचा अत्यल्प विचार झाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात शेकडो शिक्षकांनी एकत्र येऊन नव्या शिक्षण धोरणाबाबत २७ कलमी प्रस्ताव तयार केला आहे. महाराष्ट्रात जवळपास ५ हजार उर्दू माध्यमाच्या शाळांमधून ४० हजारांवर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षण धोरण आता मंत्रिमंडळाने मंजूर केले असल्याने त्यात सुधारणा शक्य नाही, मात्र त्याची अंमलबजावणी करताना तरी चुकीच्या गोष्टी वगळण्यात याव्या, असा हा प्रस्ताव शनिवारी पंतप्रधानांना ईमेल करण्यात आला. विशेष म्हणजे, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी केंद्राच्या नव्या धोरणाचे स्वागतच केले आहे. मात्र काही त्रृटी काढून टाकण्यासाठी सविस्तर सूचनाही करण्यात आल्या आहेत.

‘शाळा संकुला’त उर्दूचे मरण नकोकमी पटाच्या शाळांमध्ये अधिक शिक्षकांचे श्रम व्यर्थ जाऊ नये, यासाठी नव्या धोरणात ‘शाळा संकुला’ची (स्कूल कॉम्प्लेक्स) संकल्पना आहे. एका परिसरातील १० शाळांचे यात एकत्रीकरण होणार आहे. परंतु, असे एकत्रीकरण करताना उर्दू शाळांचा समावेश एखाद्या गटात केल्यास आणि त्यात इतर शाळा मराठी किंवा इंग्रजी माध्यमाच्या असल्यास उर्दू विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची भीती आहे. त्यामुळे ‘संकुल’ करताना त्यात केवळ उर्दू माध्यमाच्याच शाळा असाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आहेत प्रस्तावातील ठळक मागण्या- जेथे प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमात उपलब्ध आहे, तेथील अंगणवाडीही उर्दू माध्यमाची करावी. - शहरी भागात विद्यार्थी-शिक्षक (पीटीआर) अशी संचमान्यता ठिक आहे, मात्र ग्रामीण भागात त्याऐवजी वर्ग-शिक्षक (सीटीआर) अशी संचमान्यता करावी.- कोणत्याही शाळेतील रिक्त पद एक महिन्याच्या आत भरण्यात यावे.- विद्यार्थ्यांच्या मनात जातीभेदाची भावना वाढविणऱ्या इतिहास विषयातील घटना वगळाव्या.- पटसंख्येची अट न ठेवता प्रत्येक वर्गाला संगणक, टीव्ही द्यावा.- प्रस्ताव न मागविता शिक्षकांना पुरस्कृत करा, प्रतिनियुक्ती पद्धती बंद करा.- दिव्यांगांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र शाळा निर्माण करा.- शिष्यवृत्तीच्या रकमा शालेय सत्राच्या सुरवातीलाच द्या.

नव्या शिक्षण धोरणात ९९ टक्के बाबी चांगल्या असल्या तरी ५ टक्के सुधारणा आवश्यक आहेत. ज्या प्रमाणे या धोरणाच्या मसुद्यावर जनतेच्या सूचना घेण्यात आल्या, त्याच प्रमाणे संसदेत त्यावर खासदारांची चर्चा घडविणे आवश्यक होते. ते झाले नाही. त्यामुळे निदान अंमलबजावणीत तरी सुधारणा व्हावी म्हणून आम्ही प्रस्ताव दिला. - जमीर शेख नजीर शेख, सचिव, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना

 

टॅग्स :Educationशिक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी