शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
3
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
4
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
5
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
6
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
7
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
8
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
9
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
10
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
11
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
12
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
13
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
14
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
15
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
16
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
17
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
18
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
19
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
20
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

अवैधरित्या वास्तव्य करणारा अमेरिकेचा माजी सैनिक पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 21, 2017 15:36 IST

व्हीजाची मुदत संपल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

 ऑनलाइन  लोकमतनागपूर, दि. 21 -  व्हीजाची मुदत संपल्यानंतरही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करणाऱ्या अमेरिकन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशूवा मेसियाक लॅबोविथ (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो अमेरिकन सैन्य दलाचा माजी सैनिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो येथे नेमका कोणत्या उद्देशाने राहत होता, ते स्पष्ट न झाल्यामुळे याशूवा हेरगिरी तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाने प्रशासनाची झोप उडवून दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याशूवा विदेशी सफरीच्या नावाखाली २०१३ मध्ये भारतात आला. १० जून २०१३ ला तो नागपुरात आला. सामाजिक कार्याच्या नावाखाली धर्माचा प्रचार प्रसार करताना याशूवाने काही मिशनरीजच्या माध्यमातून एका हॉटेलमध्ये प्रारंभी मुक्काम केला. नंतर मात्र त्याने एक भाड्याचे घर बघितले. सामाजिक कार्याच्या नावााखाली सर्वत्र मुक्त संचार आणि मुक्त संवाद करतानाच तो दीपाली नामक तरुणीच्या संपर्कात आला. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. पुढे हे दोघे दुस-या ठिकाणी आणि नंतर तेथून बोरगावमधील गोकुल हाऊसिंग सोसायटीतील अल्फाईन मेडॉस (फ्लॅट नं. ३०२) येथे वास्तव्याला आले. येथे हे दोघे आणि दीपालीची मैत्रीण परिसरातील नागरिकांच्या ओळखीचे आहे. ते काय कामधंदा करतात, ते कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांची लाईफ स्टाईल आलिशान असल्याचे परिसरातील मंडळी सांगतात. त्यांच्याकडे येणारांची खासकरून नव्या महिला-पुरुषांची सारखी वर्दळ असते. असा झाला खुलासाशहर पोलीस दलात उपायुक्त दर्जांच्या अधिका-यांचे नुकतेचे फेरबदल झाले. विशेष शाखेतही निलेश भरणे हे नवीन उपायुक्त रुजू झाले. त्यांनी विशेष शाखेचा रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी वेगवेगळळ्या पद्धतीने सर्वांकडून माहिती संकलीत करणे सुरू केले आहे. त्यातुन नागपुरात विदेशी नागरिक किती आहे, त्याचीही माहिती त्यांनी विविध पोलीस ठाण्यातून मागितली. त्यात साडेतीन वर्षांपूर्वी नागपुरात आलेला याशूवा लॅबोविथचे नाव अधोरेखित झाले. तो सध्या काय करतो, कुठे राहतो, त्याचा पासपोर्ट, व्हीजाची मुदत वाढवून घेतली काय, असे प्रश्न उपस्थित झाल्याने विशेष शाखेकडून १९ मे रोजी गिट्टीखदान पोलिसांना एक पत्र मिळाले. त्यानुसार, हवलदार गजानन ठाकरे आणि संजय पांडे यांनी याशूवाची शोधाशोध सुरू केली. चौकशीत याशूवा गोकुल सोसायटीत राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी शनिवारी त्याला गाठून त्याची विचारपूस केली. पुढे आलेल्या माहितीनंतर पोलीस दलच नव्हे तर अवघ्या प्रशासनातच खळबळ उडाली. याशूवाच्या व्हीजाची मुदत कधीचीच संपली अन् त्याने त्याच्या पासपोर्टचेही नुतनीकरण केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिवारी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध विदेशी नागरिक कायदा १९४६ कलम १४, अ,ब,क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अनेक अधिकारी ठाण्यात पोहचले. तेव्हापासून तो येथे लपून छपून का राहत होता, काय करीत होता, दीपालीची काय भूमीका आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करीत आहेत.   हेरगिरीकडे अंगुलीनिर्देशसध्या भारत-पाकिस्तानमध्ये कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावरून वादळ उठले आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे चिनने अमेरिकेच्या १२ गुप्तहेरांची हत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पोहचल्याने ह्यहेरगिरीह्णचा विषय जगभरात चर्चेला आला आहे. अशात अमेरिकन याशूवाचे नागपुरातील संशयास्पद वास्तव्य ह्यहेरगिरीह्णकडे अंगुलीनिर्देश करणारे ठरले आहे. त्यामुळे शहर पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. याशूवा संबंधीची माहिती खालीलप्रमाणे आहे. पासपोर्ट क्रमांक ५०४७४४२२०निवासी परवाना क्रमांक (आरसी नंबर) १६४/ १३ (दि. ३० १०. २०१३) पारपत्र नुतनीकरण अथवा व्हीसा मुदत वाढविण्यासंबंधात कुठेही अर्ज केलेला नाही.