शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, माझं नक्की काय चुकलं?, शालिनीतार्इंचा सवाल, शरद पवारांकडे भेटण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 19:20 IST

‘आर्थिक निकषाचा मुद्दा मी जाहीरपणे मांडला तर मला पक्षातून काढले. आता आपण याच मुद्द्याचे समर्थन करत आहात, याचं आश्चर्य वाटतं.

वाठार स्टेशन : ‘आर्थिक निकषाचा मुद्दा मी जाहीरपणे मांडला तर मला पक्षातून काढले. आता आपण याच मुद्द्याचे समर्थन करत आहात, याचं आश्चर्य वाटतं, तेव्हा माझं काय चुकलं,’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी खासदार शरद पवार यांना पत्राद्वारे विचारला आहे. तसेच ‘आपण मला एक दिवस मुंबईतील माझ्या घरी भेटायला या,’ अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे की, आपले सरकार सत्तेवर आले तर आम्ही सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी प्रवेश देताना गुणवत्तेचा विचार करू, आर्थिक निकषाचे धोरण अंमलात आणू, असे लेखी आश्वासन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिले होते. हाच मुद्दा मी त्यावेळी जाहीरपणे मांडला. राजकारणातल्या माझ्या कारकिर्दीला साठ वर्षे झाली आहेत. आपल्यापेक्षा मी राजकारणात आणि वयानेही ज्येष्ठ आहे. १९९९ ते २००९ ही दहा वर्षे मी राष्ट्रवादीची आमदार म्हणून विधानसभेत सन्मानाने बसले. त्याच वेळी आर्थिक निकषावर आरक्षणाची मी प्रथम पक्षांतर्गत मागणी केली. त्यावेळी मला आपण ताकीद देऊन थांबवू शकला असता; परंतु आपण थेट मला काढूनच टाकले. याच मुद्द्यासाठी लाखो मराठा बांधव संघर्ष करत आहेत. त्यावेळी मी वयाची सत्तरी ओलांडली होती. माझ्या सक्रिय कामाची थोडी वर्षे उरली होती. विधानसभेची आणखी एखादी टर्म पूर्ण करून मी आनंदाने निवृत झाले असते; परंतु तशी संधी मला मिळाली नाही, याचा खेद वाटतो. राष्ट्रवादीत राजकीय कारकिर्दीचा सन्मानाने शेवट झाला असता तर अधिक योग्य झाले असते. राजकारणातल्या दीर्घ कारकिर्दीत माझे आणि आपले संबंध नेहमीच तणावाचे राहिले. वसंतरावदादांचे सरकार पाडण्याची घटना असेल किंवा साखर उद्योगात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चेअरमनपदावर राहण्याचा विषय असो. माझे आणि आपले टोकाचे मतभेद होते. तरीही आपण मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. दोनवेळा विधानसभेचे तिकीटही दिले, त्यासाठी मी आपले आभार मानते. आज मी ८५ व्या वर्षांमध्ये वाटचाल करते आहे. घरातल्या घरात ओल्या फरशीवर घसरून मी पडल्यामुळे मला आधाराशिवाय चालता येत नाही. तरीही तब्बेत बरी आहे. माहिमच्या घरी मुलगा, सून, नातवंडांमध्ये सुखी आहे, असेही पत्रात म्हटले आहे.आपण मुंबईला असताना कधीतरी माझ्या घरी भेटावे, यासाठी या पत्राद्वारे मी आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहे. मी आपली वाट पाहत आहे,’ असे पत्र माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना पाठविले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील शालिनीताई समर्थक कार्यकर्त्यांनाही त्यांनी पत्रे पाठविली आहेत.