शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:44 IST

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची मुंबई बाहेरच धरपकड सुरु केली होती.

मुंबई - बँक घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर शरद पवार हे आज खुद्द ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याने त्यांना पाठींबा म्हणून राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते सकाळपासूनचं मुंबईत दाखल होताना पाहायला मिळत होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती. तर अशा परिस्थितीत माजी आमदार जयवंत जाधव यांनी चक्क पाठीला कॉलेज बॅग लावून विद्यार्थ्याच्या वेशात  पक्षाचे कार्यालय  गाठल्याचे पाहायला मिळाले.

शरद पवार हे दुपारी २ वाजता 'ईडी'च्या कार्यालयात जाणार असल्याने, त्यांच्या समर्थनात राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही तिथे जमा होणार असल्याने पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. तर 'ईडी'च्या ऑफिस जवळच असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात राज्यभरातील कार्यकर्ते जमा होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची मुंबई बाहेरच धरपकड सुरु केली होती.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी व 'ईडी'च्या कार्यालयात जाण्यासा पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अशा परिस्थिती आपण पक्षाचे कार्यकर्ते वाटू  नयेत म्हणून नाशिकचे विधान परिषेदेचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी चक्क पाठीवर कॉलेज बॅग लावून विध्यार्थाची वेशभूषा करत थेट राष्ट्रवादीचे कार्यालय गाठले. विशेष म्हणजे त्यांचावर पोलिसांना सुद्धा संशय आला नाही.

पोलिसांनी राष्ट्रवादी कार्यालय परिसरात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे त्या परिसरात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जमाव करण्यासाठी थांबवले जात होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या कारवाई विरोधात पक्षाच्या आंदोलनात सहभागी व्हायचे असे ठरवून आलेले जाधव यांनी गनिमी  कावा करत पक्षाचे कार्यालय गाठल्याने ते चर्चेचे विषय ठरले.