शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दर साडेदहा मिनिटांना देशात एकास सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:15 IST

राज्यात सर्वाधिक प्रमाण; आरोग्य व्यवस्थापन प्रणालीचा अहवाल

मुंबई : देशात सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर महिन्यांत राज्यात ३३ हजार ६७३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर देशात १ लाख ६१ हजार ४७८ सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४-१५ साली ३८ हजार ५१४, २०१५-१६ साली ३९ हजार १०३, २०१६-१७ साली ३६ हजार ६० सर्पदंशाच्या घटना घडल्या. देशात दर साडेदहा मिनिटाला एका व्यक्तीला सर्पदंश होतो, असे भारत सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशीगंधा नाईक यांनी या संदर्भात सांगितले की, देशात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, त्यावर तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. देशात एड्स आजाराने सर्वांत जास्त बळी जातात. त्यानंतर, सर्पदंश होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकार एड्सवर उपाययोजना, जागृती करते. मात्र, सर्पदंशाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती जास्त प्रमाणात होताना दिसून येत नाही. सर्पदंशाच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू