शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पितृछत्र हरवले तरी सचिन साळवेने जिद्दीने केला अभ्यास मिळवला पहिला नंबर

By admin | Updated: June 19, 2017 16:57 IST

लहान पणीच पितृ छत्र हरवले....घरात भावंड....विवाह योग्य बहिणी...डोक्यावर छप्पर नाही....आईने कष्टाने संसाराचा गाढा ओढून दिलेल्या प्रेरणेने

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमत सिल्लोड, दि. 19 -  लहान पणीच पितृ छत्र हरवले....घरात भावंड....विवाह योग्य बहिणी...डोक्यावर छप्पर नाही....आईने कष्टाने संसाराचा गाढा ओढून दिलेल्या प्रेरणेने भराडीच्या सरस्वती भुवन प्रशालेच्या सचिन साळवे यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.नुकतेच दहावीचा निकाल लागला त्यात सचिन 90.60 टक्के घेऊन शाळेतुन प्रथम आला.तो पहिलीला असताना वडिलांचं छत्र हरवलं घरात दोन बहिणी विवाह योग्य दोन भावंड आर्थिक स्थिती अत्यंत बिकट कोणाचाच आधार नाही. जमीन अत्यंत कमी तेही कोरडवाहू त्यामुळे वर्षभराची गुजराण होणे कठीणच घरातील सर्वजण मजुरी ने जात... मिळालेल्या मजुरीतून दिवसाची गुजराण होत... नातेवाईक समाजाची सहानुभूती कोरडीच प्रत्यक्ष मदद म्हणजे बोलाचीच कढी बोलाचा भात अशा स्थितीत सचिनच्या आई ने उमेद दिली. शिक्षणासाठी पैसा कमी पडू न देण्याचा संकल्प केला तिच्या थकल्या डोळ्यानी मुलांनी मोठे होण्याचे स्वप्न पहिले दिव्यासारखी अहोरात्र जळणाऱ्य आई च्या प्रेरणेने सचिन जिद्द ने अभ्यासा ला लागलावह्या पुस्तकासाठी तो रविवारी इतरांच्या शेतात राबराब राबायचा परिस्थितीत माणसाला प्रौढ बनवते असे म्हणतात सचिनच्या बाबतीत हे खरे होते रोज सकाळी पाचला उठून अभ्यास करणे आई ला घरकामात मदत करणे शाळेला जाणे घरी आल्यावर घरच्या शेतीत काम करणे रात्री बारा एक पर्यंत अभ्यास करणे हा त्याचा दिनक्रम होता रोजचा अभ्यास रोज यामुळे अभ्यासाचा ताण आला नसल्याचे सचिनने सांगितले प्रत्येक विषयाच्या पाच पाच प्रश्नपत्रका सोडवल्या मन लाऊन मनन चिंतानाद्वारे अभ्यासाची केलेली औरुती आत्मविश्वास वाढवणारी भविष्यात इंजिनिर होण्याचे स्वप्न असल्याचे सचिनने सांगितले आपले यश पहाण्यासाठी आज वडील असायला हवे होते हे सांगताना त्याचे डोळे भरून आले गौरव खैरनार शाळेतुंन तिसरा याच शाळेचा विद्यार्थी गौरव खैरनार हा 87.80 टक्के गुण घेऊन शाळेतुन तिसरा आला. त्याची कहाणी अस्वस्थ करणारी आहे. अकारा वर्षापूर्वी अपघातात त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला....ना जमीन ना घर तीन बहिणी एक भाऊ उदरनिर्वासाठी आईने टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. आर्थिक स्थिती दुर्बलच पण त्यासमोर हार ना खाता आई जिद्दीने उभी राहिली... टेलरिंग करुन दोन्ही मुलींचे विवाह केले.मुलाला शिक्षणासाठी कमतरता भासू नये म्हणून रात्रीचा दिवस करून ब्लाउज व इतर शिवणकाम केले... मुलात आत्मविश्वास पेरला...गौरव ने पण आईचे कष्ट वाया जाऊ दिले नाही. अभ्यासाचे काटेकोर नियोजन केले शाळा व घर,घर व शाळा एवढेच वर्षभर त्याला माहित होते. आईला कपड्याच्या काचबटन साठी रात्र रात्र जागून मदत केली लोकांचे चांगले कपडे हाताळताना... स्वतःच्या साध्या कपड्याकडे बघून वाईट वाटे...वडील असते तर इतरांसारखे मलाही सर्व मिळाले असते या विचाराने त्याचे डोळे पानावतात... नियमित तासिका टिप्पणी काढणें... मुद्देसूद लेखन... प्रश्नपत्रिकां सोडवणे.. यामुळे उत्तम यश मिळायचे..तो सांगतो स्वाभिमान बाण्यामुळे परस्थिती चे कधी भांडवल केले नाही भविष्यात इंजिनियर होण्याचा संकल्प केल्याचे तो सांगतो सकारात्मक दृष्टी असेल तर जग जिंकता येते यावर गौरव चा विश्वास आहे आपले यश वडिलांच्या चरणी अर्पण केल्याचे सांगताना गौरव गहिवरतो.