शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:51 IST

माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई- विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली आहे. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईतील विकास भाजपमुळे, भाजप गरिबांचा विकासासाठी काम करणारा पक्ष, त्यांच्या घरांसाठी भाजप प्रयत्न केले. संविधानात इतकी ताकद आहे की त्याच्याशी कोणी छेडछाड करू शकत नाही. संविधानानं लोकशाही जिवंत ठेवली, विरोधकांनी पक्ष बचाव रॅली काढली आहे.महाराष्ट्रात ज्यांची दुकानदारी संपली, ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही ते होऊ देणार नाही. हा आवाज भाजपचा आहे, आमचा आवाज बंद करण्याची कुणाचीही हिंमत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. तिरंगा रॅली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. या रॅलीत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार देखील सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुपारी दोन वाजता सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगण(कामगार मैदाना)वर झाला आहे. चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीनं मार्गक्रमणाला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा